लिहून ठेवा. महाआघाडी सरकार तूर्तास पडणार नाही.(भाजपा तर पुढाकार घेऊन कधीच पाडणार नाही.)
- dhadakkamgarunion0
- Mar 16, 2021
- 2 min read
*@ABHIJEETRANE(AR)*
वर्तमानपत्रे टराटरा फाटताना आजवर आपण अनेक वर्षे पहात होतो ..
वर्तमानपत्रवाल्यांची "टराटरा फाटताना" पहाणे हा ताजा / नवा अनुभव आहे..
खरे आहे ना ?

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
एकदा शरद पवार साहेबांनी"सचिन वाझे हा 'लोकल .. अदखलपात्र .. विषय आहे" असे म्हणताना आणि त्यावर भाष्य करण्यास नकार देताना सर्व महाराष्ट्राने न्यूज चॅनल्सवर पाहिल्यावर तेच तेच तेच न्यूज चॅनल दुसरे दिवशी अख्खा दिवस शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांपासून पक्षातील ज्येष्ठ मंत्री आणि काही अधिकारी यांच्याशी चर्चा केली अशा ब्रेकिंग न्यूज चालवतात हा विरोधाभास आश्चर्यकारक असेल तर त्याची जबाबदारी जबाबदारी कोणाची कोणाची ?

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
लिहून ठेवायचे.. अभिजीत राणे लिहितो म्हणजे ती काळ्या दगडावरची रेष आहे असे समजायचे ... नाही नाही नाही.. ग्रृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची अथवा खातेबदलाची सुतराम शक्यता नाही नाही नाही. महत्वाचे कारण म्हणजे "तसे केले तर तो वि.प.नेते देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक विजय ठरेल." ते महाआघाडी सरकारला परवडणारे नाही नाही नाही. उच्चपदस्थ अधिकारी वर्गाची आहुती दिली जाणार.. पण राजकीय नेत्यांचा बळी नाही. आत्ताच माझे ज्येष्ठ पत्रकार मित्र थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोलले. माझी बातमी रिकन्फर्म झाली आहे.

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
आत्ताच माहितगार मित्राचा मेसेज आला आहे की "स्कॉर्पिओ मधील जिलेटीन कांड्या केव्हा कुठून कुणी कशा आणल्या ही महत्त्वपूर्ण माहिती सचिन वाझे यांच्याकडून ए एन आय ला मिळाली असून याक्षणी ए एन आय पथक संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत आहे.

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
एन आय ए चा "पंजा" म्हणजे 'मांजरी'चा पंजा नसून "वाघा"चा असा 'पंजा' आहे की ज्यातून कोणीच निसटून जाऊ शकत नाही हे लक्षात येते आहे का तुमच्या .. आणि ज्यांच्या लक्षात यायला हवे त्यांच्या ?

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
मला ठाऊक नव्हते की चाणक्याने "त्या"काळी म्हणजेच तब्बल दोन हजार सातशे वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते की "जर अंतर्गत शत्रू / विरोधक प्रबळ होत असतील तर राज्यकर्त्याने साथीच्या रोगांचे जाणीवपूर्वक प्रचलन / वर्धन करून लोकांचे लक्ष विचलित आणि विरोधकांचा दुष्प्रचार निष्प्रभ करावा. प्रसंगी गुप्तचरांच्या माध्यमातून जनमानसात दहशत निर्माण होईल अशा अघोरी किंवा अन्य अफवांचा प्रसार करून लोकांच्या सार्वजनिक विचरणावर (वावर किंवा भटकण्यावर) बंधने आणावीत ज्यायोगे राजाविरोधातील असंतोष संघटित होणार नाही" ... ग्रेट! 2700 वर्षांपूर्वीच चाणक्याने 2019/2020/2021 मधील घडामोडींवर भाष्य लिहून ठेवले होते असे म्हणायचे की काय?

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
मिडीया "त्या" उच्चपदस्थ व्यक्तीबाबत या क्षणाला भाष्य करीत नाही याचा अर्थ मिडीया भ्याड आहे असा कृपया कुणी करून घेऊ नका. ज्या क्षणी "तो" उच्चपदस्थ "त्या" उच्च पदावरून पदच्युत होईल आणि एन आय ए च्या कोठडीत जेरबंद होईल त्यानंतर मग तुम्हीच बघाल की हा शूरवीर धैर्यशील शौर्यवान निर्भय निर्भीड निःपक्षपाती मिडीया "त्या"च्या अख्ख्या करीयरची कशी लक्तरे लोंबवतो आणि अब्रूच्या कशा 24×7 चिंध्या उडवतो!! मिडीयाला काय समजता काय तुम्ही ???

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
सिरियसली.. मला आधी वाटले की "तो" नोकरीच्या इंटरव्हूसाठी त्याचा बायोडाटा आणि कुटुंबीयांची सुशिक्षित, सुसंस्कृत पार्श्वभूमी सादर करतो आहे.. पण न्यूज चॅनेल्सवर कोण असा बायोडाटा देईल असा प्रश्न विचारण्या आधीच लक्षात आले की "तसे नाही. हे आरोपांबाबत उत्तर आहे" पण तरी मनात एक प्रश्न कायम राहीला की "पदवीधर, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परदेशात अत्युच्चतम शिक्षण घेतलेले किमान एक हजार "सुशिक्षित सुसंस्कृत महनीय कौटुंबिक पार्श्वभूमीचे लोक विविध गुन्ह्यात आरोपी असल्याचे तर आपल्यालाच ठाऊक आहे. मग केवळ सुशिक्षित सुसंस्कृत किंवा उच्चभ्रू कौटुंबिक पार्श्वभूमी हे आरोपांबाबत इन्कार आठी सबळ पुरावा मानता येईल काय? न्यायालयात हे पदवीधर असणे निर्दोषत्वाचा निकष म्हणून ग्राह्य धरण्यात येईल काय?

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
लिहून ठेवा. महाआघाडी सरकार तूर्तास पडणार नाही. (भाजपा तर पुढाकार घेऊन कधीच पाडणार नाही.) महाराष्ट्रात महाआघाडीतील घटक पक्ष एकमेकांना सांभाळून घेत रहाणार आणि त्यामुळेच सरकारला तूर्तास धोका नाही च च च ! आज "ते" "ह्यांना" सांभाळून घेत आहेत. उद्या 'हे' "त्यांना" सांभाळून घेतील. "एकमेका सहाय्य करू... अवघे धरू (कु)पंथ असे (अ)समर्थांनी लिहून ठेवले नसले तरी सत्य आहे.

Comments