🖋️ABHIJEET RANE (AR)
महाराष्ट्रातील इतिहास संशोधक.. सामाजिक आणि राजकीय संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते..
विशेषत: मराठा आंदोलकांनी..
चर्चा.. वादविवाद करून निर्णय घ्यावा असे दोन विषय / प्रश्न..
मी आज आपल्यासमोर सादर करीत आहे..
1) "पेशवाई" ही "शिवशाही"चा 'भाग' मानायची की नाही ?
2) "मराठा" साम्राज्याचा "पूर्वार्ध" "शिवशाही"..
आणि "उत्तरार्ध" "पेशवाई" हे विधान स्वीकारणार की नाकारणार ?
www.abhijeetrane.in
◆
🖋️ ABHIJEET RANE (AR)
लाॅटरीचे तिकीट घेतले..
त्या तिकीटाला लाॅटरीही लागली..
पण आता ते लाॅटरीचे तिकीटच कुठे सापडत नाहीये..
अशा अवस्थेत..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत..
असे मला वाटतेय.!
सत्तेत सहभागी आहे..
पण भागीदार नाही..
हे दु:ख त्या 'हरवलेल्या' लाॅटरी तिकीटासारखेच नाही काय.?
www.abhijeetrane.in
◆
🖋️ ABHIJEET RANE (AR)
एका "रात्री"साठी पाच हजार रुपयांपर्यंत "चार्ज" करणा-या "अभिनेत्री"च्या "संगती"साठी पाच कोटी रुपये खर्चून मराठीत चित्रपट बनविणा-या निर्मात्यांची कमी नाही..
मला नावानिशी अशी अनेक निर्माते मंडळी माहिती आहेत.!
ह्या "मेंटॅलिटी"चे राजकीय नेते ..
महामंडळांवरील नेमणुकांसाठी..
असेच कोट्यावधी रूपये मोजायला तयार असतात..
ज्याचा मंत्रिमंडळातील सदस्यांचे इष्ट मित्र नातेवाईक कार्यकर्ते दलाल अचूक (गैर)फायदा घेतात..
आणि अनेकांकडून एकाच महामंडळांवरील नियुक्तीसाठी कोट्यावधी रूपये गोळा करतात...
कधी कधी मला शंका येते की..
ज्यांनी एकाच वेळेस अनेकांकडून विशिष्ट पद.. महामंडळांवरील नियुक्तीसाठी पैसे घेतले.. आणि काही प्रमाणात "शेअर" केले आहेत..
तेच मंत्रिमंडळातील काही सदस्यांचे "निकटवर्तीय" महामंडळांवरील नियुक्त्या दबाव आणून रोखून ठेवत आहेत..
कारण जर विविध महामंडळांवरील नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर झाल्या तर..
एकतर अनेकांकडून घेतलेले लाखो-करोडो रुपये परत करावे लागतील.. बिंग फुटेल.. "वरच्यां"शी व्यवस्थित "शेअर" केले नसतील तर "निकट" असून वाट "बिकट" होईल.
चौकशी करा.. तुम्हालाच "महामंडळात नियुक्तीत इंटरेस्ट आहे" असा बहाणा करा..
पहा कसा "निकटवर्तीयां"चा.. दलालांचा तुम्हाला वेढा पडतो..!
वेश्याव्यवसायाच्या बिंग स्फोटांसाठी पोलीस नाही का.. "बोगस" "गिऱ्हाईक" पाठवत ?
तुम्ही कुठल्यातरी पद किंवा महामंडळांवरील सदस्यत्वाचे "बोगस इच्छुक" बनून निकटवर्तीय वर्तुळात एंट्री घ्या..
तुम्हाला धक्काच बसेल इतके दलाल तुमच्याभोवती पिंगा घालू लागतील.
त्यात काही मंत्र्यांचे कुटुंबीय देखील आढळून येतील.
हा खेळ मी फार जवळून पहात असतो आणि मला अशा नियुक्तीत स्वारस्य नसल्याने मौज बघत या "पागलपंती"ला हसत असतो !
www.abhijeetrane.in
◆
🖋️ ABHIJEET RANE (AR)
मंत्र्यांच्या "दुस-या घरोब्यां"ची चर्चा होते..
माझा चॅलेंज आहे..
सरकारी अधिकाऱ्यांच्या..
विशेषत: जी "खाती" वरकमाईसाठी प्रसिद्ध आहेत..
त्या खात्यांच्या..
पोलीस.. सार्वजनिक बांधकाम.. प्रदूषण.. पाटबंधारे.. एक्साईज.. नगरविकास अंतर्गत महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी..
यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने.. नकळत..
हजारो हजारो..
होय.. हजारो अधिकाऱ्यांचे..
"दुसरे घरोबे"
काही उघडपणे
काही लपवून
आहेत..
माझ्याच माहितीत ही संख्या शेकड्यात आहे..
पण पहा चर्चा कुजबूज होते ती फक्त राजकीय नेत्यांची..
मंत्री
खासदार
आमदार
नगरसेवक
यांच्या "लफड्यां"ची..
अधिकाऱ्यांच्या "सेकंड होम" कुलंगड्यांची नाही !
www.abhijeetrane.in
◆
🖋️ ABHIJEET RANE (AR)
मी पत्रकार या नात्याने राजकीय वर्तुळात वावरत असतो हे ठाऊक असल्याने..
सर्वसामान्य माणसे सहजपणे अनौपचारिक जवळकीने हमखास विचारतात..
अभिजीतजी..
जे नामदार खासदार आमदार नगरसेवक
लाखो करोडो रूपये खातात त्याचे पुढे काय करतात ?
कोण ? कसा ? केव्हा ? किती ? काय ? का..?
पैसे "खातो"
पुढे ते पैसे खर्च कसे कुठे किती करतो?
त्यातले किती कसे कुठे गुंतवतो ?
"पार्टी बाॅस"शी किती टक्के "शेअर" केले जातात ?
किती व्यवहार रोखीने होतात ?
बेहिशोबी अनअकाऊंटेड पैसा "व्हाईट" कसा केला जातो ?
काळ्या पैशांच्या गुंतवणूकीसाठी हे नेते.. लोकप्रतिनिधी कोणाचा सल्ला घेतात ?
यांच्यावर सहसा ईडी किंवा इनकम टॅक्सच्या धाडी पडत कशा नाहीत ?
महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीत राजकीय नेते अधिक भ्रष्ट आहेत
की
अधिकाऱ्यांकडून जास्त "खाबूगिरी" केली जाते ?
असे अनेक अनेक प्रश्न मला निखळ प्रांजळ पारदर्शक उत्तरांच्या अपेक्षेने विचारले जातात.
आज आज आज
मी इतकेच सांगतो
की.. मी देणार म्हणजे देणारच आहे..
या सर्व प्रश्नांची मला ठाऊक असलेली खरी उत्तरे..
फक्त एकदम एकाच वेळेस नाही.
अधूनमधून वेळोवेळी
ह्या सर्व प्रश्नांची उकल करणार..
मला माहित आहे ..
जरी त्यामुळे
नेते.. लोकप्रतिनिधी.. लोकसेवक यांचा भ्रष्टाचार नाही थांबणार..
तरी मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार..
प्राण पणाला लावून..
जीव धोक्यात घालून..
वाट पहा.. कशी वाट लावतो..!
www.abhijeetrane.in
Comments