*@ABHIJEETRANE(AR)*
_(कर्मदरिद्री आणि दळभद्री)_
लस येण्यास आणि कोरोना कमी होण्यास एकच गाठ पडली..
आधीच मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग संदर्भात उदास निरुत्साही निष्काळजी असणा-या भारतीयांचा लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वाटत नाही.
लस मिळवण्यासाठी स्पर्धा होईल असे वाटत होते ..
पण आता सरकारवर लस टोचून घेण्यासाठी सक्ती करायची वेळ येईल की काय अशी शंका येतेय.
काल अदर पूनावाला म्हणाले.. ती 'न्यायालयीन स्थगिती'ची शक्यता.. कधीपासून माझ्या मनात पिंगा घालते आहे.
आपल्या देशात कर्मदरिद्री जनता , दळभद्री राज्यकर्ते आणि विघ्नसंतोषी न्यायालये यांची अभद्र युती असल्याने काहीही होऊ शकते.
खरे की नाही?
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
देवेंद्रजी व अजितदादा होते एकत्र परवा पुण्यातील एका समारंभात.
शेजारी शेजारी बसल्यावर "त्या" 80 तासांच्या आठवणी जाग्या झाल्याच असणार.
कल्पना करूया.
काय आले असतील विचार दोघांच्या मनात.
एक नक्कीच की दोघेही "सत्य" जाणत असल्यामुळे एकमेकांविषयी 'निगेटिव्ह' भावना नक्की नक्की नसणार.
देवेंद्रजींना 'सर्वोच्च न्यायालयाने डाव मोडला' हे आठवून निर्दोष अजितदादांबद्दल सहानुभूती पुन्हा वाटली असेल.
अजितदादांच्या मनात 'शरद पवार साहेबांकडून 'डबल गेम' झाला नसता तर आज आपण या मंचावर देवेंद्रजींचे उपमुख्यमंत्री म्हणून बसलेलो असतो हे लक्षात येऊन आपल्यामुळे देवेंद्रजींना बट्टा थट्टा रट्टा सहन करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही याची खंत मनात मधमाशीने जाता जाता डंख करून जावे तशी डंख करून गेली असणार.
माणसे मोठी झाली की त्यांना आसू हासूंमध्ये लपवून खूप काही होत असताना काहीच झाले नाही असे 'नाटक' करावे लागते हिच त्या "मोठेपणा"तील अटळ शोकांतिका असते !!
ww.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
'कृषी कायदा स्थगित झाल्याशिवाय शेतकरी आंदोलन स्थगित होणार नाही..'
हा मेसेज मी सकाळी लिहितो आहे..
पण वाटाघाटी संध्याकाळपर्यंत होणार आहेत..
पाहूया माझा अंदाज खरा ठरतो काय?
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
मंदिरे खुली झाली. सरकारची भीती खोटी ठरली.
भक्त सगळे नियम धाब्यावर बसवून प्रचंड गर्दी करीत असूनदेखील कोरोना केसेसमध्ये घट होत राहिली!
सरकारच्या भ्याडपणामुळे आणि प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे नाहक लाॅकडाऊन लांबत गेला.
कोरोनाचा सोशल डिस्टन्सिंगशी संबंध खरोखर असता तर दिल्लीभोवती वेढा घालून बसलेल्या लाखो शेतकऱ्यांपैकी किती कोरोनाबाधित निघायला हवे होते ?
कुठे काय? अजिबात नाही.
जे 48 शेतकरी मृत्यू पावले त्यांच्यापैकी कोणाच्याही मृत्यूचे कारण कोरोना नाही.
मास्क तोंडावर नाही.
सॅनिटायझर नाही.
सोशल डिस्टन्सिंग नाही..
नेते देशभरात लाखोंचे राजकीय मेळावे घेत आहेत.
लग्नसमारंभात मंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो लोक सहभागी होत आहेत.
तरीदेखील कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी कमी होत आहे.. याचाही खुलासा हे तीन नियम मोडले म्हणून कोट्यावधी रूपयांचा दंड आणि प्रदीर्घ लाॅकडाऊन लादणा-या केंद्र व राज्य सरकारने करायला हवा आणि निर्बंधाचा निर्णय चुकला असे सिद्ध झाल्यास तशी कबुली देण्याचा प्रामाणिकपणा दाखवायला हवा.
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
महाराष्ट्रातील जवळपास सर्व मंत्री ,सत्तारूढ व विरोधातील नेते यांच्या जेवढ्या सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीच्या बातम्या मी न्यूज चॅनेलवर बघतो आहे त्यातील बातम्यांत त्यांच्या तोंडावर अजिबात मास्क नाही किंवा नाकाखालीच घसरलेला आहे. त्याचवेळेस ह्याच चॅनल्सवर सरसर्वसामान्यांना पोलीस दंड करताना किंवा फटकावून काढताना दाखवीत आहेत.
बा ! सरकारा, काहीतरी एक नियम ठरवा, नाहीतर कोणालाच सक्ती करू नकोस!
स्वतःच्याच बुडाखाली असंतोषाचे फटाके या पक्षपातामुळे लागत आहेत आणि निवडणूकीत ते नक्की "वाजणार" हे समजून का येत / घेत नाही ?
ज्या फांदीवर आपण बसलो आहोत ती (जनाधाराची) फांदी तोडण्याचा हा आत्मघात कशासाठी?
ww.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
बहुतेक प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मिडीयावरील पत्रकार खा. संजय राऊत यांना मिळणा-या असाधारण राष्ट्रीय प्रसिद्धीवर प्रचंड जळतात आणि "पगारी नोकर पासून हुकुमाचा गुलाम" पर्यंत जमतील तशी दूषणे देतात , अगदी शिवीगाळ देखील करतात पण पण बिचा-यांची मजबुरी अशी आहे की संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे "मुख" आणि "सामना" शिवसेनेचे मुखपत्र असल्याने मत्सर द्वेष अनावर होत असूनदेखील संजय राऊत यांच्या प्रत्येक विधानात 'बातमी' असल्याने झक मारत हेडलाईन किंवा ब्रेकींग न्यूज करणे भाग पडते आहे. अरे यार, उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना पर्याय उपलब्ध नाही तर तुम्हाला कसा काय असणार? संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्याऐवजी पर्याय उपलब्ध आहे पण मी कशाला नाव सांगू..? तुम्ही तर्क करू शकता ? काॅमेंटमध्ये तर्क व्यक्त करा.
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
होय.. होय.. होय..! भाजपा नेत्यांवर.. देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता.. संघ परिवार नियंत्रित.. भाजपातील .. "गाभा चमूचे (कोअर ग्रुप) नियंत्रण कक्षातून नियंत्रण असते.. ! सेन्सॉरशिप म्हणालात तरी चालेल..! पक्ष धोरणाच्या चौकटीत न बसणारी विधाने करणा-यांना कधी सूचना कधी तंबी देऊन सुधारणा बदल किंवा विधाने मागे घेण्यास प्रवृत्त किंवा भाग पाडले जाते.
पण मला हे माहित नव्हते की आता ही स्टेटमेंट वरील सेन्सॉरशिप आता भाजपाच्या मित्र पक्षातील नेत्यांवर देखील लागू झाली आहे.
हे उघडकीस आले तेव्हा..
जेव्हा मंत्री रामदास आठवले यांनी "औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास आपला विरोध आहे" असे जाहीर केले जे भाजपाच्या विद्यमान धोरणात बसणारे नव्हते त्यामुळे एकच खळबळ उडाली.
बहुतेक भाजपा "सेन्सॉरबोर्डा'ची तातडीची बैठक झाली असावी आणि भाजपा नेत्यांना जशी विधान किंवा ट्विट मागे घेण्याची किंवा डिलीट करण्याची सूचना वजा आदेश देण्यात येतो तसाच तो मित्र पक्षातील मंत्री रामदास आठवले यांना दिला गेला असावा कारण अकस्मात काही कारण न सांगता रामदास आठवले यांनी चक्क औरंगाबादचे संभाजीनगर करण्यास विरोध करणारे ट्विट डिलीट केले आणि 'युती'चे नेते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असे जाहीर करून आपणही चर्चेनंतर मत व्यक्त करू असा "यू टर्न" घेतला.
भाजपा आणि शिवसेनेत प्रवक्ता होणे म्हणजे तारेवरील कसरत आहे.
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
फिल्मी अड्ड्यांवर गांजासाठी धडाधड धाडी घालणारे अंमली पदार्थ विरोधी ब्युरोचे अधिकारी साधू-बैराग्यांचे मठ आणि अड्डे यावर का धाडी घालत नाहीत?
लाखो ऐवजी अब्जावधी रूपयांचा गांजा चरस अफू अगदी सहज हाती लागेल..
की हिंदुंच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेय व्यक्ती यांना एक्पोझ न करण्याची हिंदुत्ववादी सरकारकडून सूचना नारकोटिक्स अधिकाऱ्यांना आहे ???
www.abhijeetrane.in

◆
🖋️ *@ABHIJEETRANE(AR)*
बाळासाहेब थोरात आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत.
प्रभाव नाव वलय नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व प्रभुत्व किवा संघटना कौशल्य आमदार संख्या नसताना देखील त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभाग मिळवून दिला हे विसरता येणार नाही. अर्थात त्या बद्दल कोणीही काँग्रेसवाला एक शब्द देखील कृतज्ञतापूर्वक बोलत नाही / बोलणार नाही.. पण इतिहास नक्कीच नोंद घेईल. आपणसुद्धा बाळासाहेब थोरात यांचे श्रेय त्यांना जरूर देऊया !!
www.abhijeetrane.in

Comments