राहुल गांधींच्या अराजकतावादी मानसिकतेवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र
*[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*राहुल गांधींच्या अराजकतावादी मानसिकतेवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र*
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या राजकीय रणनीतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आत्मपरीक्षण करून संघटनेतील त्रुटी सुधारण्याऐवजी, काँग्रेस विनाकारण इतर मुद्द्यांवरून राजकारण करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. काँग्रेसवर निशाणा साधताना फडणवीस यांनी, ‘जखम कपाळाला असताना पट्टी गुडघ्याला बांधली जात आहे,’ असा खोचक टोला लगावला. पराभवाच्या मूळ कारणांचा शोध न घेता निवडणूक प्रक्रिया आणि स्वायत्त घटनात्मक संस्थांवर सातत्याने अविश्वास दाखवणे हे राहुल गांधींच्या अराजकतावादी मानसिकतेचे लक्षण असल्याचे फडणवीस म्हणाले. अशा भूमिकेमुळे लोकशाही व्यवस्थेलाच तडा जात असल्याचा इशारा त्यांनी दिला. राहुल गांधींच्या नेतृत्वावर स्वतः त्यांच्याच पक्षात विश्वास उरलेला नाही, असा दावा करत फडणवीस यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. देशवासीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि विकासाच्या अजेंड्याला का पसंती देत आहेत, याचा अभ्यास काँग्रेसने केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. जनतेचा विश्वास परत मिळवायचा असेल, तर घटनात्मक संस्थांना बदनाम करणे थांबवून काँग्रेसने आत्मचिंतन करावे, असा स्पष्ट सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments