राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळेगाव, पुणे येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्जित आणि समाजसेवेच्या मूल्यांना समर्पित ‘पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालया’चे उदघाटन केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ आणि केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’अंतर्गत प्रत्येकी ५, ००००० रूपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. या योजनांमुळे गरजू नागरिकांना इन्शुरन्स आणि ॲशुरन्स दोन्ही मिळते. राज्यातील आरोग्य व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येत आहे. याद्वारे आरोग्य सुविधांचे मोठे जाळे निर्माण करून प्राथमिक आरोग्य सुविधेला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. तसेच द्वितीय स्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा आमचा संकल्प आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची निर्मिती होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments