राज्यातील प्रकल्पांच्या भूसंपादनाला वेग द्या; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना
- dhadakkamgarunion0
- Jun 24
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
राज्यातील प्रकल्पांच्या भूसंपादनाला वेग द्या; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना
● राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचना दिल्या. राज्यातील महत्वाकांक्षी ११ प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या ५३ हजार ३५४ कोटी रुपयांच्या निधीची तरतुदही करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे. भूसंपादनाची कामे गांभिर्याने घेऊन तातडीने मार्गी लावाव्यात.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments