top of page

मोदी परिवाराच्या ‘VRX Healthcare’ केंद्राचे कांदिवलीत भव्य उद्घाटन; कामगार नेते अभिजीत राणे यांचा जिव्हाळ्याचा सहभाग

  • dhadakkamgarunion0
  • Jun 15
  • 1 min read

मोदी परिवाराच्या VRX Healthcare Pvt. Ltd. च्या तिसऱ्या केंद्राचे डहानुकरवाडी, कांदिवली (पश्चिम) येथे भव्य उद्घाटन संपन्न झाले. डायबेटिक फूट आणि व्हेरिकोज वेन सुसज्ज सुपरस्पेशालिटी क्लिनिक, २४x७ डायग्नोस्टिक सेवा, फिजिओथेरेपी, तसेच शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक व त्वचारोग सल्ला अशा बहुआयामी सेवांसह हे केंद्र आता मुंबईकरांच्या सेवेत समर्पित झाले आहे.

या अत्यंत महत्त्वाच्या आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या उपक्रमासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांना मोदी परिवाराकडून विशेष निमंत्रण देण्यात आले होते.

ही आमंत्रणपत्रिका फक्त व्यावसायिक नव्हे तर भावनिक बंधाने जोडलेली होती. कारण अभिजीत राणे यांचे मोदी परिवाराशी संबंध बालपणापासूनचे असून, घरगुती व हृदयाच्या गाभ्याशी जोडलेले आहेत. एकेकाळी राणे कुटुंब मोदी कुटुंबाच्या शेजारी राहत होते. ही जुनी मैत्री आणि आपुलकी आजही तितकीच दृढ आहे.

अभिजीत राणे यांनी या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून डॉ. राजन मोदी, डॉ. नीता मोदी, डॉ. राहुल मोदी, डॉ. कृपा मोदी आणि डॉ. रवी मोदी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांनी मोदी परिवाराच्या भावी आरोग्य सेवा वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. "हे केवळ उद्घाटन नव्हते, तर एका जुन्या बंधनाचा नव्याने उजाळा होता."


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page