मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली नवमहाराष्ट्राची विकासनीती!
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 1 min read
[ पंचनामा ]
==================
मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली नवमहाराष्ट्राची विकासनीती!
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे 'मॉर्गन स्टॅन्ली इंडिया इन्व्हेस्टमेंट फोरम २०२५' या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील उद्योगस्नेही वातावरण, भक्कम पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण अशी नवमहाराष्ट्राची विकासनीती मांडणारा 'हाऊ महाराष्ट्र विल पॉवर इंडियाज ग्रोथ' या विषयावर मुक्तसंवाद साधला. यावेळी फडणवीस यांचा महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आणल्याबद्दल मॉर्गन स्टॅनली यांच्या प्रतिनिधींद्वारे सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल. सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्ध्या ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली असून, देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४०% परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, टाटा सन्सच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली असून, २० वरिष्ठ सीईओंच्या सहभागातून विस्तृत रोडमॅप तयार झाला आहे. राज्यातील औद्योगिक विस्तार केवळ मुंबई-पुण्यापुरता न राहता, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, रायगड, नाशिकसारख्या भागांत झपाट्याने होत आहे.
-अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments