मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला भविष्याचा रोडमॅप
*[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला भविष्याचा रोडमॅप*
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे, कार्यपद्धतीचे आणि भविष्यातील विकासाचे वास्तवदर्शी चित्र मांडले. विरोधकांच्या टीकेला तोंड देण्यासाठी आपली प्रेरणा कासव असल्याचे सांगताना ते म्हणाले की, माझ्याकडे कासवाचा वेग नाही, पण संकटाच्या वेळी सुरक्षित ठेवणारे आणि पुन्हा उभे राहण्याचे बळ देणारे कासवासारखे मजबूत कवच नक्कीच आहे. सामान्य जनता, उद्योजक आणि कुटुंब हीच आपली खरी ऊर्जा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च पदावर असतानाही स्वतःवरील टीका ऐकण्याची आणि चुका सुधारण्याची तयारी लोकशाहीत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागपूरची मैत्री आणि जुने ऋणानुबंध आजही तितकेच जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीतील घटकपक्षांच्या साथीने त्यांनी राजकीय आव्हानांवर मात करत समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विरोध असतानाही पूर्णत्वास नेला. आता मुंबईच्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी 'तिसरी मुंबई', ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वेस्टर्न एक्सप्रेस वेला समांतर रस्ता आणि बुलेट ट्रेन-विमानतळ जोडणी यांसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून प्रवास ४५ मिनिटांवर आणण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे. एका दूरदृष्टी असलेल्या संयमी आणि विकासकेंद्रित नेत्याचे रूप यातून समोर येते.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments