top of page

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारे निर्णय

  • dhadakkamgarunion0
  • Apr 23
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारे निर्णय

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकापासून ते गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, कामगार कायद्यांमधील सुधारणा, कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनवाढीपर्यंत आणि अतिरिक्त तसेच जलदगती न्यायालयांना मुदतवाढ देण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. स्त्री शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी २५,९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, २०२५ ला मंजूरी देण्यात आली. या निर्णयांमुळे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. सावित्रीबाई फुले स्मारक आणि गोसीखुर्द प्रकल्पासारखे उपक्रम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देतील, अशी अपेक्षा आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page