top of page

मुख्यमंत्री फडणवीसांनी घालून दिला पारदर्शी कारभाराचा आदर्शवाद

dhadakkamgarunion0

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

मुख्यमंत्री फडणवीसांनी घालून दिला पारदर्शी कारभाराचा आदर्शवाद

● 'मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असतात. मंत्र्यांना नावाचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी चालेल, पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा 'फिक्सर' लोकांच्या नावाला मंजुरी देणार नाही', अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून कुरकुर करणाऱ्यांना खडसावले आहे. फडणवीस म्हणाले की, मी कॅबिनेटमध्ये सांगितले होते तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण 'फिक्सर' म्हणून ज्यांच्या नावांची चर्चा आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्या नावांना मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाले तरी मी त्या नावांना मान्यता देणार नाही. माझ्याकडे आलेल्या १२५ प्रस्तावांपैकी मी १०९ नावांना मंजुरी दिली आहे. यावरून स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीस कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाहीत. सरकारचा कारभार पारदर्शी राहावा यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. फडणवीस तेच करत आहेत. भ्रष्ट लोकांना जवळ न ठेवण्याच्या फडणवीसांच्या या धोरणाचे कौतूकच करायला हवे. 'फिक्सर' लोकांना थारा नाही' असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पारदर्शी कारभाराचा आदर्शवाद घालून दिला आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page