मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याची कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल
- dhadakkamgarunion0
- Jun 30
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याची कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल
● राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी विविध यंत्रणांनी एकत्रितपणे राबवलेल्या उपाययोजनांना अपेक्षित यश लाभत असून, गेल्या २ वर्षांत कुपोषित बालकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण १.९३ वरून ०.६१ % तर मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण ५.९ वरून ३.११ टक्क्यांवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कामगिरी राज्याच्या एकात्मिक प्रयत्नांची फलश्रृती असल्याचे नमूद करत, या यंत्रणेतील विविध अधिकारी, घटकांचे, क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या सर्वांचेच कौतुक केले आणि सामाजिक न्याय, मानव विकास आणि महिला-लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे यश महत्त्वाचे असल्याचे सांगितले. १००% आहार पुरवठा, अचूक नोंदणी, वैयक्तिक लक्ष, नियमित गृहभेटी आणि सूक्ष्म नियोजनामुळे कुपोषणात लक्षणीय घट झाली आहे. टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार उपाययोजना राबविल्या जात असून नियमित आढावा, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यामुळे राज्यात सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comentários