मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल!
- dhadakkamgarunion0
- Jun 5
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल!
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ व ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. त्यावेळी फडणवीस यावेळी म्हणाले की, केंद्र सरकारने पीएम आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रात २०११ सालच्या बेघरांच्या सर्वेक्षण यादीनुसार प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला राज्याचे उद्दीष्ट अत्यंत कमी होते. २०१७ मध्ये हे उद्दीष्ट पुरेसे नसल्याने अधिक उद्दीष्ट मंजूर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर आलेल्या ‘आवास प्लस’ योजनेत नोंदणीची सुविधा केंद्राने दिल्याने ३० लाख बेघराची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्याची घरे पूर्ण करीत असतांना केंद्राने २० लाख घरकुलांना मंजूरी दिली. केंद्र सरकार पीएम आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरे देत असताना राज्य सरकारदेखील त्यासाठी अधिकचे ५०००० चे अनुदान देत आहे. पीएम आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलार यंत्रणा लावण्यात येत असून यामुळे लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे. तसेच पीएम आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांकरता पैसा कमी पडू देणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बेघरमुक्त महाराष्ट्र, प्रत्येकाला घर असलेला महाराष्ट्र अशा प्रकारची संकल्पना राज्य सरकार राबवत आहे.
©️ -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments