top of page

मुख्यमंत्री फडणवीसांकडून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

  • dhadakkamgarunion0
  • Apr 25
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

मुख्यमंत्री फडणवीसांकडून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

● जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे बैसरण व्हॅलीजवळ झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, ‘आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांच्याशी संपर्क साधून मी माहिती घेतली. स्थानिक प्रशासनानुसार, दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला, तर माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव जखमी झाले. सुदैवाने दोघांची प्रकृती स्थिर आहे.’ त्यांनी पुढे लिहिले, ‘या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना आहे.’

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page