🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले कुशल नेतृत्व
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकरी केंद्रित धोरणे राबवली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा वॉटर ग्रीड, नदीजोड प्रकल्प, सोलर फिडर, कर्जमाफी, एक रुपयात पीक विमा आणि नमो शेतकरी महासन्मान योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. राज्य सरकारने ई-पंचनामा, ई-फेरफार आणि कॉम्प्युटराईज्ड सातबारा उताऱ्यामुळे शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया सुलभ केली आहे. तसेच, सौरऊर्जेच्या मदतीने दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेतून आर्थिक मदत मिळत आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments