मीरा-भाईंदर वसई -विरार आयुक्तालयचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आज 'दै.मुंबई मित्र /वृत्त मित्र' चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी आज भेट घेतली व त्यांनी केलेल्या सहकार्य बद्दल त्यांचे आभार मानले व त्यांचा शाल व पँथर ची प्रतिकृती देऊन सत्कार केला.
पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत 'दै.मुंबई मित्र' चे वितरण करणाऱ्या अभिषेक तिवारीचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती त्यासंदर्भात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी संबंधित आरोपिं वर कशाप्रकारे अधिक कठोर शासन करता येईल याबाबतीत सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली.
----
#abhijeetrane #dailymumbaimitra #newspaper #mumbai #AR #maharashtrapolice #police #madhukarpandey #commishner #mirabhayandar #vasaivirar
댓글