मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील यशस्वी 11 वर्षांचा कार्यकाळ निमित्त वर्सोवा विधानसभा संकल्प सभा
- dhadakkamgarunion0
- Jul 3
- 1 min read
वर्सोवा विधानसभा आयोजित भव्य संकल्प सभा संपन्न झाली. या कार्यक्रमास भाजपा मुंबई सरचिटणीस सुनील राणे, भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे, भाजपा - मुंबईचे उपाध्यक्ष अमरजित मिश्रा यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अभिजीत राणे यांनी यावेळी सांगितले "केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारताने सर्व क्षेत्रांमध्ये भक्कम पायाभूत प्रगती केली असून, या यशात कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा मोठा वाटा आहे. सर्वांनी एकत्र येऊन समाजसेवा व विकासाच्या संकल्पांना पुढे नेले पाहिजे.
वर्सोवा विधानसभेच्या माजी आमदार भारती लव्हेकर, वर्सोवा विधानसभा (वर्सोवा पश्चिम मंडल) चे अध्यक्ष उर्मिला गुप्ता, मा. नगरसेवक योगीराज दाभाडकर, मा. नगरसेविका रंजना पाटील व मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#SankalpSabha #11YearsOfModiGovernment #AbhijitRane #Versova #BJP #Leadership #कार्यकर्त्यांचा_सन्मान #BJPMumbai





















Comments