top of page
  • dhadakkamgarunion0

महाराष्ट्रातील जनता जरा जास्तच सोशिक झाली आहे काय ?

*@ABHIJEETRANE(AR)*

आपण केवळ नववर्षात नव्हे तर 2021 म्हणजेच नव-दशकात प्रवेश करणार आहोत हे लक्षात घ्या आणि नववर्षाचे संकल्प करीत असतानाच पुढील संपूर्ण दहा वर्षांतील तुमच्या संकल्प प्रकल्प विकल्प यांची संकल्पना आणि अंमलबजावणी याचा 'ब्ल्यू प्रिंट' तुमच्या मनात तयार असायला / करायला हवा !!


 

*@ABHIJEETRANE(AR)*

कौतुकास्पद की हास्यास्पद ? 'अमेझाॅन'ची मराठीच्या मुद्दय़ावर कोंडी आणि अडवणूक करणा-या मनसेला हे कसे लक्षात येत नाही की 'अमेझाॅन' मुंबई व ठाण्यातील बहुसंख्य कामगार कर्मचारी वितरक वर्ग हा शुद्ध निखळ निर्विवाद मराठी मराठी मराठी आहे आणि जगभर पसरलेल्या अवाढव्य अजस्र 'अमेझाॅन'ची मुंबई व ठाण्यात कोंडी करून काय होणार ? फक्त फक्त एकच होणार.. आपली मराठी पोरे अडचणीत येणार.. अति झाले तर नोक-या गमावणार.. दहा महिन्यांनी नुकतेच कुठे रोजीरोटी मिळू लागली होती बिचा-यांचा तो 'घास' देखील मनसे हिरावून घेणार काय?


 

*@ABHIJEETRANE(AR)*

महाराष्ट्रातील जनता जरा जास्तच सोशिक झाली आहे काय ? की मुर्दाड झाली आहे ? कर्नाटक राज्यात सरकारने महाराष्ट्राप्रमाणे रात्रीची संचारबंदी जारी करून ख्रिसमस सेलेब्रेशन आणि हाॅलीडे मूडची वाट लावणारा निर्णय जाहीर केल्यानंतर एवढा प्रचंड जनक्षोभ उसळला की 24 तासात कर्नाटक सरकारला संचारबंदी झक मारत मागे घ्यावी लागली.. आणि महाराष्ट्रात.. सरकार लादील ते नियम.. जबरदस्ती करील ते कायदे.. हाणतील ते तडाखे आणि मारतील ते फटके सहन करीत पब्लिक थंड आहे.. थंड आणि षंढ मधील जणू फरक महाराष्ट्रातील जनता विसरून शरणागत झाली आहे !!


 

*@ABHIJEETRANE(AR)*

9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 18 हजार कोटी रुपये जमा केले.. शेतकरी आंदोलनावर याचा काहीच परिणाम होणार नाही असे मला वाटते. शेतीवर आयकर नाही, ज्यात त्यात नुकसान भरपाई आहे ,जिथे तिथे सब्सिडी आहे म्हणून कधी शेतकऱ्यांकडून कृतज्ञतापूर्वक धन्यवाद.. मोदी सोडा.. आजवरच्या कुठल्या केंद्र किंवा राज्य सरकारांना मिळालेत.. तर आता मोदींना शेतकऱ्यांकडून , त्यांच्या नेत्यांकडून किंवा संघटनांकडून साभार श्रेय मिळेल ? अशक्य!अशक्य!अशक्य! मदत, दान, अनुदान, कर्जमाफी, सब्सिडी दिली सरकारने तर ते कर्तव्यच असते, त्याबद्दल आभार कसचे मानायचे .. पण नाही दिली किंवा अपेक्षेपेक्षा कमी दिली तर ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते अपराधी पापी खलनायक च असते.. हा शेतकऱ्यांकडून मिळालेला आजवरचा अनुभव आणि इतिहास आहे.. 'नेकी कर.. कुवेंमें डाल' तसे मोदींनी 9 कोटी शेतकऱ्यांना दिलेले 18 हजार कोटी पाण्यात जाणार आणि कृतज्ञतेऐवजी कृतघ्नताच मोदी आणि भाजपाच्या वाट्याला येत उद्या नव्हे आजपासूनच शेतकऱ्यांकडून आणि विरोधकांकडून टीका टिपणी राडारोडा शिवीगाळ सुरू होणार हे लिहून ठेवा. साक्षात परमेश्वर जरी आला तरी तो शेतकऱ्यांचे समाधान करू शकणार नाही . . मग पंतप्रधान मोदी काय किंवा मुख्यमंत्री ठाकरे काय.. ही तर माणसेच आहेत !


 

*@ABHIJEETRANE(AR)*

महाराष्ट्र सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची जी संकल्पित यादी राज्यपाल माननीय कोश्यारी यांचेकडे गेली आहे ती मंजूर करण्याच्या मानसिकतेत राज्यपाल नव्हतेच पण आता त्यांच्यावर आरोप करण्याची सोय महाआघाडीतील नेत्यांना उरणार नाही कारण आता हे राज्यपाल नियुक्त आमदारांचे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहे आणि आपण हायकोर्टाच्या व नंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पहात आहोत असे म्हणत राज्यपाल प्रदीर्घ कालावधीपर्यंत निर्णय प्रलंबित ठेवू शकतात आणि महाआघाडीतील पक्ष त्यांना लक्ष्य करू शकत नाहीत!!


 

*@ABHIJEETRANE(AR)*

@ABHIJEETRANE(AR)

आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते करीत असलेली स्तुतीपर भाषणे ऐकताना वाजपेयींची अखेरची काही वर्षांत कशी उपेक्षा अवहेलना अवमानना अवमूल्यन खुद्द भाजपा नेत्यांकडून झाले होते त्याच्याही आठवणी जाग्या होतात आणि मोठ्या माणसांच्या महानतेची प्रचीती भारतात त्यांच्या मृत्यूनंतर होते हे वाक्य पुन्हा प्रत्ययाला येते. अटल बिहारी वाजपेयी यांची अखेर झाली ती शोकांतिकाच नव्हती काय? आता या स्तुतीसुमनांचे मूल्य निर्माल्य इतकेच उरले नाही काय ?


9 views0 comments

Comentarios


bottom of page