@ABHIJEETRANE (AR)
महाराष्ट्रात जणू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाच काळजी आणि समज आहे आणि बाकी साडेबारा कोटी लोक निष्काळजी आणि अक्कलशून्य आहेत अशा अभिनिवेशात दोघेही भाषणे करीत असतात आणि वारंवार लाॅकडाऊन लादण्याच्या धमक्या देत निर्बंध / कारवाई आणखी कडक करण्याचे इशारे देत असतात.. ह्या विरूद्ध आवाज उठविण्याची गरज आहे असे मला वाटते.
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
घोळ आणि गोंधळ अगदी हमखास प्रत्येक निर्णया संदर्भात घातल्याशिवाय ठाकरे-पवार सरकारला काहीच करता येत नाही काय ? शाळा कॉलेजेस् सुरू करण्याच्या निर्णयातील धरसोड आणि अनिश्चितता हे अकार्यक्षमता आणि विचार-विवेक शून्यता याचे शेकडों पैकी एक उदाहरण आहे.
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
झाडाचे पान पडले म्हणून "आकाश कोसळले" असा आरडाओरडा करीत जंगलभरच्या प्राण्यांना पळापळ करायला लावणा-या भेदरलेल्या भित्र्या सशाची इसापनीती मधील कथा "थोरल्या" "पेशव्यां"चे फेसबुक लाईव्ह वरील "कोरोना"ची "त्सुनामी" येणार अशी भयकंपित भाषणे ऐकताना आठवते. हो बाबा हो.!! लक्षात घ्या राजेहो.. लाॅकडाऊनच्या काळात वाढल्या त्यापेक्षा कमी प्रमाणात लाॅकडाऊन उठविल्यावर महाराष्ट्रात कोरोना केसेस वाढल्या हे तरी लक्षात घ्याल की नाही की "भेदरटपणा ही माझी हुशारी आणि घाबरटपणा ही तुमची जबाबदारी " ही पाॅलिसी आहे ?
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
"लव्ह जिहाद" कायदा लागू करण्यात भाजपा शासित राज्ये पुढाकार घेतील पण त्या निमित्ताने ज्या "सेक्युलर" राज्यांत भाजपा विरोधी पक्षाची सरकारे सत्तेत आहेत तिथे हिंदूंमध्ये अस्वस्थता , अशांतता , असंतोष निर्माण होईल आणि पुढल्या काळात बंगाल, तामिळनाडू , हरियाणा इत्यादी राज्यातील विधानसभा निवडणुकींपर्यंत हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल ही जी भाजपाची व्युहररचना आहे ती लक्षात घेतली पाहिजे. लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी आणि शहा समान नागरी कायदा विधेयक मांडतील आणि लव्ह जिहाद कायदा हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. 2024 ची लोकसभा निवडणुक जनसामान्यांच्या मुलभुत प्रश्नांवरील लक्ष अन्यत्र वळविल्याशिवाय जिंकता येणार नाहीत याची जाणीव असल्याने मोदी आणि शहा भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध चीन संघर्ष, काश्मीर मधील दहशतवादी संघटना आणि फुटीरतावादी प्रादेशिक पक्षांची भारतद्रोही भूमिका, राममंदिराची उभारणी, मुस्लिम धर्म प्रचार आणि प्रसाराला रोखणारे कायदे आणि यातून घडणारे हिंदू मतांचे राष्ट्रीय पातळीवरील ध्रुवीकरण आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या राजकीय नपुंसकीकरणाची, कायदेशीर कारवाईची आणि पक्षीय पातळीवरील विभाजनाची प्रक्रिया या माध्यमातून निवडणुका जिंकण्यासाठी संरचना करीत आहे असे मला वाटते.
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRAN (AR)
भारत पाक सीमेवर नगरोटा येथे 150 मीटर लांब आणि दहा पंधरा फूट खोल भुयार भारतीय जवानांनी शोधून काढले. याच भुयारातून दहशतवादी भारतात घुसले होते जे चकमकीत मारले गेले. भारतीय जवानांचे मनापासून अभिनंदन. पण पण पण.. एक प्रश्न पडतो की ह्या भुयाराची व्याप्ती लक्षात घेता किमान महिना, पंधरा दिवस हे काम दहशतवाद्यांनी केले असणार, मग ते लक्षात का आणि कसे आले नाही? लष्करी गुप्तचर यंत्रणांना सुगावा कसा लागला नाही? अशी आणखी किती भुयारे किती ठिकाणी असू शकतील हे त्या त्या वेळी कळणार का आधी शोध घेतला जाणार? यशातून अपयश कधी कधी उजेडात येते ते असे !!
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, सी सुब्रमण्यम अशा 23 नेत्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात पत्र लिहून उपस्थित केलेल्या प्रश्नांचे एकमेव उत्तर आहे की गांधी घराण्याचा नाद सोडून काँग्रेसवाल्यांनी पर्यायी नेतृत्व आपल्याच 23 तथाकथित बंडखोर नेत्यांनी परस्पर सहमतीने निवडायचे आणि प्रसंगी सोनिया आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष फोडला तरी माघार घ्यायची नाही. सोनिया आणि राहुल गांधी यांची 23 नेत्यांना डावलून पक्ष चालविण्याची हिंमत असेल असे वाटत नाही. आपल्या शिवाय देशभरातील काँग्रेसवाल्यांना पर्याय नाही ह्या उन्माद आणि अहंकारामुळे गांधी बेदरकारपणे काँग्रेस उद्ध्वस्त झाली तरी हरकत नाही असे स्वैरपणे वागत आहेत. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला पर्यायी समर्थ सेक्युलर पक्ष उपलब्ध नाही ही शोकांतिका काँग्रेस आणि गांधी परिवाराला अभय देते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही ही भाजपाची आजची सुखांतिका उद्याची शोकांतिका ठरेल असे म्हटले जाते.. काँग्रेस या शोकांतिकेची बळी ठरताना दिसते आहे!!
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा विरूद्ध गुपकार अशी सरळ लढत आहे. दहशतवादी पाकिस्तान धार्जिण्या इस्लामी संघटना मेहबूबा मुफ्ती आणि शेख फारूख / ओमर आणि इतर भारतद्वेष्ट्यांमागे आहेत. मला शक्यता किंबहुना भीती अशी वाटते की जम्मू मध्ये आणि लडाख मध्ये जरी भाजपाचे बहुमत मिळवण्याइतके वर्चस्व असले तरी काश्मीरमध्ये बाकी सर्व पक्ष एकत्र येऊन लढत असल्याने निर्विवाद बहुमत गुपकार पक्षांना मिळेल आणि त्याचा अर्थ गुपकार नेते हे मोदी आणि शहा यांच्या काश्मीरविषयक सुधारणांचा मतदारांनी केलेला पराभव असाच लावणार. हे भाजपाला आणि भारताला परवडणार नाही त्यामुळे प्रसंगी शासकीय यंत्रणा आणि निमलष्करी दलांचा (गैर)वापर करून आणि गरज असेल तर मतदान आणि मतगणनेत हेराफेरी करून पण गुपकार पक्षांचा पराभव करणे हे भारतीय सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य, संरक्षण आणि भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
www.abhijeetrane.in
Comments