*@ABHIJEETRANE(AR)*
मराठा आरक्षणाचा खटला घटना पिठा पुढे किती काळ चालेल आणि काय निष्पन्न होईल याची अनिश्चितता आणि संशयास्पदता यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आंदोलन स्थगित करण्याचे सर्व पर्याय संपुष्टात आले आहेत आणि केवळ केवळ फक्त फक्त राज्य सरकारला 'स्व'तंत्रपणे, 'स्व'बळावर 'स्व'त्व सिद्ध करीत मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी रचनात्मक संघर्ष आणि आंदोलनासह सुसंवाद असा पवित्रा घेऊन अनुकूल निर्णय घेण्यासाठी भाग पाडणे अपरिहार्य आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल खटल्याची दखल न घेता आता मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा जनता न्यायालयात सोडवून घ्यावा लागणार आहे. या आधी मराठा तरूणांनी बलिदान केले तरी राज्य सरकारने न्याय मिळवून दिला नाही. आंदोलन केले तरी फडणवीस सरकारच्या काळात मिळालेल्या आरक्षणाचे रक्षण केले नाही. न्यायालयीन लढाई लढण्याआधीच हरल्याच्या पराभूत मानसिकतेत महाआघाडी सरकार स्वतः कोंडीत सापडलेले आहे आणि मराठा समाजाला खिंडीत गाठले आहे. कोरोनाचा भयगंड आणि कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची आवई उठवीत सरकार मराठा आरक्षणाच्या आंदोलकांची रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची तयारी आणि झुंजारपणा याला रोखण्यासाठी अनेक कट कारस्थाने करीत आहे. पण "एक मराठा - लाख मराठा" ही शक्ती या पलीकडची आहे. दिल्लीबाहेरून महामार्गावर वेढा घालून नाकेबंदी केल्याची घटना शेतकरी आंदोलनात घडते आहे. उद्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रूपांतर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद अशा महानगरांच्या वेढ्यात आणि कोंडीत होऊ शकते. मराठा आरक्षणाचा खटला आता न्यायालयाच्या बाहेर लढण्याशिवाय गत्यंतरच नाही. मराठा आरक्षण आंदोलकांनी सामूहिक नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे आंदोलन आता व्यक्ती निरपेक्ष.. समाज सापेक्ष झाले आहे. मी अभिजीत राणे.. समूह संपादक दै मुंबई मित्र आणि दै वृत्त मित्र तसेच महासचिव, धडक कामगार युनियनचे या नात्याने मराठा आंदोलकांनी सामूहिक नेतृत्वाखाली घेतलेल्या प्रत्येक निर्णयाशी सहमत राहीन आणि आदेशानुसार सक्रीय सहभागी होईन ही माझी जबाबदारी आणि उत्तरदायीत्व असेल ही ग्वाही या निमित्ताने आज देतो आहे !!
www.abhijeetrane.in

*@ABHIJEETRANE(AR)*
प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर शरद पवार साहेबांना दोन वेळा शक्य आणि आवश्यक असूनही पंतप्रधानपद नाकारल्या बद्दल केलेला आरोप नवा नाही.. अनेकदा याची चर्चा झाली आहे.. पण साहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त "आनंदी आनंद गडे" असे वातावरण महाराष्टात पसरले असताना आणि काँग्रेस महाआघाडी सरकारमध्ये असताना आणि अलीकडेच पवार साहेबांनी राहुल गांधी यांच्या राजकीय मर्यादा व अपरिपक्वतेवर अणकुचीदार भाष्य केलेले असताना प्रफुल्ल पटेल यांनी पवार साहेबांवर गांधी परिवाराने कायम अविश्वास आणि अन्याय केला असे विधान केल्यामुळे काँग्रेस नेत्यांना गालावर थप्पड आणि ढुंगणावर लाथ एकाचवेळी बसल्याची भावना निर्माण होऊन महाआघाडी सरकारच्या भवितव्यात काँग्रेसचे भविष्य काय ? असाही प्रश्न पडला असणार !!
www.abhijeetrane.in

*@ABHIJEETRANE(AR)*
कोरोना प्रतिबंधक लस फक्त सरकारी माध्यमातून वितरित करण्याचा निर्णय पक्षपाती, अन्यायकारक आणि भ्रष्टाचाराला रान मोकळे करणारा आहे. हा समाजातील विशिष्ट सामाजिक, आर्थिक वर्गाला 'स्व'निर्णय आणि 'स्व'गरजेतून लसीकरणापासून वंचित वंचित वंचित ठेवण्यासाठी केलेल्या कारस्थानाचा एक भाग वाटतो. शासकीय लस काही राज्यांनी - महाराष्ट्र नाही नाही नाही - मोफत देण्याचे जाहीर केले आहे पण त्याचवेळी खाजगी आरोग्य यंत्रणांच्या मार्फत सशुल्क ही लस घेण्याची परवानगी असायला हवी हवी हवी असे मला वाटते !!
www.abhijeetrane.in

*@ABHIJEETRANE(AR)*
ओबीसी नेते आणि संघटनांची बैठक भाजपातर्फे आयोजित करण्यात आली होती. या मधील देवेंद्रजी फडणवीस यांचे भाषण हे ऐतिहासिक म्हणावे लागेल. वक्तृत्वावरील प्रभुत्व आणि मुद्देसूद युक्तीवाद चातुर्यासह मार्गदर्शन हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येकच भाषणाचे कायम वैशिष्ट्य असते ते ओबीसी मेळाव्यात देखील दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात: 1) महाआघाडी सरकार ओबीसी समाजाच्या विरोधात आहे 2) मराठा आणि ओबीसी समाजाला आपसात झुंजविण्याचा महाआघाडी पक्षांचा प्रयत्न आहे 3) ओबीसी आरक्षणात अन्य वाटेकरी लादल्यास उग्र आंदोलन भाजपा करील 4) महाआघाडी सरकारने ओबीसी समाजासाठी असलेल्या योजना आणि महामंडळे मृतावस्थेत नेऊन ठेवली आहेत. 5) महाराष्ट्रातील विधीमंडळात सर्वाधिक ओबीसी आमदार भाजपाचे असल्याने ओबीसींच्या हितरक्षणाची विशेष जबाबदारी भाजपावर आहे 6) लवकरच ओबीसी अंतर्गत येणा-या सर्व जातींची परिषद आयोजित करण्यात येईल.... असे अनेक महत्वाचे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आणि उपस्थित ओबीसी नेते आणि कार्यकर्ते यांची मने जिंकत असतानाच महाआघाडी सरकारचीही आरपार पोलखोल केली. महाराष्ट्रातील सर्व मराठी न्यूज चॅनल्सनी देवेंद्र फडणवीस यांचे हे भाषण लाईव्ह दाखवून महाराष्ट्रात आजही विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री असेलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे सर्वोच्च स्थान अबाधित आहे हे जणू अधोरेखित केले..!!
www.abhijeetrane.in

*@ABHIJEETRANE(AR)*
उद्धवजींच्या मुख्यमंत्री म्हणून होत असलेल्या महाराष्ट्रातील दौ-यांचे स्वरूप पूर्णतः शासकीय असते तर याआधीचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात शासकीय दौ-यासोबत देवेंद्रजी न चुकता, कटाक्षाने त्याच परिसरात भाजपा नेत्या-कार्यकर्त्यांचा मेळावा हमखास घेत असत ज्याचा भाजपा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांची एकजूट वाढवून स्थानिक मतभेद दूर करायला आणि प्रशासकीय यंत्रणेला भाजपा नेत्यांना सन्मान मिळावा यासाठी मेसेज द्यायला उपयोग होत असे.. पण उद्धवजींच्या मुख्यमंत्री म्हणून होत असलेला महाराष्ट्रातील दौरा कुठेही शिवसेनेला व शिवसेना नेते आणि संघटना यांना संधी आणि बळ देताना अजिबात दिसत नाही हे मला जाणवते आहे.. तुमच्या किंवा शिवसैनिकांच्या लक्षात आले आहे का ?
www.abhijeetrane.in

Comments