top of page

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्त्वाची; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

  • dhadakkamgarunion0
  • May 4
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्त्वाची; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

● महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, ५०० एकरमध्ये असलेल्या मुंबईतील चित्रपटनगरीत अ‍ॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी खास १२० एकरमध्ये मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प आगामी काही महिन्यांत प्रत्यक्षात येणार आहेत. या व्हेव्ज परिषदेद्वारे भारताने क्रिएटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दाखविले आहे. आता भारत क्रिएटिव्ह क्षेत्रातही नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत, असे सांगत फडणवीसांनी सर्व जगाला भारताच्या नव्या ‘क्रिएटिव्ह व्हेव्ज'चे स्वागत करण्याचे आवाहन केले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page