महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच फडकत राहावा; श्री क्षेत्र देहूत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रार्थना
- dhadakkamgarunion0
- Jun 19
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच फडकत राहावा; श्री क्षेत्र देहूत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रार्थना
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बळीराजा सुखी राहावा, सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच फडकत राहावा, अशी मनोभावे प्रार्थना केली. दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली. महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

コメント