🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
● राज्यात मराठी भाषेवरून पुन्हा एकदा जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभेत मराठीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. राज्यातील प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे. आम्ही इतर भाषांचा सन्मान करतो, पण ज्याला आपल्या भाषेवर प्रेम असते तोच इतर भाषांचाही सन्मान करतो,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी यांच्या मराठीवरील वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावरून राजकारण करणाऱ्यांना फडणवीस यांनी गप्प केले आहे. ते म्हणाले की, ‘मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच राहील. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे. मात्र, आम्ही इतर भाषांचाही सन्मान करतो.’
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

留言