top of page

मराठा नेते अभिजीत राणे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

dhadakkamgarunion0

● छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ‘मराठा क्रांती मोर्चा’ कडून ‘शिव जयंती’चे आयोजन

आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘शिवजयंती’ साजरी

● मराठा नेते अभिजीत राणे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

----

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती मोठ्या आदराने व उत्साहाने महाआरती करत साजरी करण्यात आली. ‌‘मराठा क्रांती महामोर्चा‌’कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील 9 वर्षांपासून हा कार्यक्रमाचे घेत असल्याचे आयोजक मराठा क्रांती महामोर्चा, महामुंबई विरेंद्र पवार यांनी सांगितले. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव मराठा नेते अभिजीत राणे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास महाराष्ट्राचे कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार बाळा नर, आमदार भाई जगताप, अभिनेत्री दिपाली सय्यद, प्रसिध्द निवेदक प्रदिप भिडे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी ‌‘मराठा क्रांती महामोर्चा‌’चे प्रशांत सावंत, किरण सावंत, अश्विनी भोसले, महेश गोरुले (गुरुजी) उस्थित होते.












 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page