मतदानाच्या आकड्यांवरून हवेत तीर’; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार
- dhadakkamgarunion0
- Jun 25
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
मतदानाच्या आकड्यांवरून हवेत तीर’; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार
● ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने नैराश्यात गेलेल्या राहुल गांधी यांना तर्कहीन वक्तव्ये करत आपली अधोगती झाकण्याचा प्रयत्न करताना पाहून खेद वाटतो,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी निवडणुकीतील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर संशय व्यक्त करत मतमोजणी प्रक्रियेवर शंका उपस्थित केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘तुमच्या पराभवाचे खापर जनतेवर, निवडणूक आयोगावर आणि मतदानाच्या आकड्यांवर फोडण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या पक्षातील नेतृत्वशक्तीचा आणि समन्वयाचा अभाव तपासायला हवा.’ फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार बौद्धिक हल्ला चढवत, त्यांच्या वक्तव्यांना ‘नैराश्याचे द्योतक’ असे ठरवले असून, वास्तवात डोकावण्याऐवजी हवेत तीर मारणं, ही काँग्रेस नेतृत्वाची नवी सवय झाली आहे, अशी उपरोधिक टीका केली.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments