*@ABHIJEETRANE(AR)*
भाई जगताप अखेर मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झालेच ! आता नेत्यांनी राडा आणि कार्यकर्त्यांनी शिवीगाळ सहन करण्याची मानसिक तयारी करून ठेवलेली बरी! स्वभावाला औषध नसतं आणि पद नसताना किंवा असताना वागणं बोलणं करणं बदलत नसत. ताप संताप मनःस्ताप पश्चात्ताप याचे नवे पर्व आता मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू होणार आहे. धमक्या आणि शिवीगाळीच्या फोनपासून पत्रकार देखील सुरक्षित असणार नाहीत .. प्रतिकूल प्रतिक्रिया देणा-यांनी येणारे मोबाईल रेकाॅर्ड करून व्हायरल करायला सिद्ध रहावे हा सल्ला!!!

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
मुंबई प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून मुंबईतील "अहमद पटेल " "प्रफुल्ल पटेल " "अमरसिंह " या तिघांची कंबाईंड मिनी आवृत्ती असलेले माजी आमदार चरणसिंह सप्रा यांची निवड झाली आहे. भाई जगताप यांच्या रफटफ वागण्या - बोलण्यामुळे मुळे जे नेते-कार्यकर्ते मनाने जखमी होतील आणि सहकारी महाआघाडी पक्षातील दुखावतील त्यांच्या साठी "चरणसिंह सप्रा छाप कंडू बाम" उपयोगी पडेल हे नक्की. चरणसिंह सप्रा माणूस चांगला सुस्वभावी सुसंस्कृत सुसंवादी आणि विश्वासार्ह आहे पण मंत्रालयात पब्लिक रिलेशन आणि डायनिंग करता करता मध्यस्थी करणारा दलाल अशी आपली प्रतिमा तर होत नाही ना? हे जपावे लागेल!!

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
काँग्रेसचे सुदैव की दुर्दैव हे काळच ठरवील पण पण पण.. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे ! तुम्हाला हे सुदैव वाटते की दुर्दैव ? मला राहुल गांधी अध्यक्ष होणे हे मोदींचे सुदैव आणि देशाचे दुर्दैव वाटते !!

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
2012 नंतर प्रथमच 19 दिवसात मुंबईत साडेदहा हजार घरांची विक्री झाली याचा अर्थ लाॅकडाऊन आणि कोरोना नंतरही ज्यांच्याकडे "समृद्धी" आहे असा मोठा वर्ग आहे फक्त फरक एवढाच पडला आहे की जो तो स्वार्थी विचार करतोय आणि स्वतःच्या वैयक्तिक सुख सोयी सुविधांवर "होऊन जाऊ दे खर्च" ही भूमिका घेतो आहे फक्त फक्त फक्त इतरांना "पैसे नाहीत" म्हणून बहाणे करण्यासाठी, सांगण्यासाठी आणि देणी टाळण्यासाठी लाॅकडाऊन आणि कोरोनाची कारणे पुढे केली जात आहेत. याआधी नोटबंदीच्या बहाण्याने लाखो धूर्त लबाड बनेल माणसांनी असेच ज्यांचे ड्यूज .. न्याय्य.. पैसे रास्त व्यवहारातील.. देण्याची टाळाटाळ केली होती. पण त्याही लोकांची तेव्हाही आणि आताही वैयक्तिक जीवनात चैन चंगळ मौजमजा मस्ती ऐय्याशी नशेखोरी स्वैराचार चालू होता. कालच एका व्यापा-याने निम्मे कर्मचारी काढले आणि उरलेल्यांचे पगार निम्मे केले असे सांगून झाल्यावर जानेवारीत मुलीच्या लग्नासाठी किमान पाच सात कोटी रुपये खर्च करणार असल्याचे निर्लज्जपणाने मलाच सांगितले. आता बोला!!

◆
*@ABHIJEETRANE(AR)*
मराठा आरक्षणाचा विषय..
ना केंद्र ना राज्य सरकारांच्या हातात आहे..
आणि दुर्दैवाने हे ठाऊक असूनही
केंद्र आणि राज्य सरकारांवर दबाव आणि जबाबदारी टाकण्याशिवाय पर्याय नाही..
ह्या पेचप्रसंगांचे सोल्यूशन कुणाकडे नाही..
ही कोंडी सुटण्याची शक्यता नाही..
ही वस्तुस्थिती मनःस्थिती दोलायमान विचलित आणि परिस्थिती गंभीर करणारी आहे..
हे आपण मान्य करायचे..
की नाकारायचे..
हे ठरत नाही..
ठरवता येत नाही..
ही शोकांतिका खरी..
पण त्याला जबाबदार कोण ??
हे सांगता येत नाही..
आणि ही परिस्थिती.. सहनही होत नाही..
पण म्हणून शांत बसता येत नाही..
आणि अशांतता निर्माण झाली तरी पुढे काय
ते सांगता येत नाही..
आणि येणार नाही..
ही गुंतागुंत..
सर्वोच्च न्यायालयाने
मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगिती इतकीच..
अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे..
हे कोणी ? कोणाला ? कसे ? का ? केव्हा ?..
सांगायचे
हे कोणी ठरवायचे ?
हे मला तुम्हाला आपल्याला कसे कळणार ?
(टीप: एवढे प्रदीर्घ सत्य कथनात्मक वाक्य वाचल्यावर तुम्हाला काय वाटले ते जरूर कळवा!!!)

Commentaires