कधी कधी एखादी बातमी शांतपणे येते...
- dhadakkamgarunion0
- Mar 20
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कधी कधी एखादी बातमी शांतपणे येते, पण तिचा अर्थ फार मोठा असतो. कावेरी इंजिनच्या D1 व्हेरिएंटने सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत आणि आता ते ‘घातक’ मानवरहित लढाऊ ड्रोनसाठी सज्ज आहे. यामुळे भारताने अमेरिका-फ्रान्ससारख्या देशांवरील इंजिन अवलंबित्व कमी करण्याची ठाम पावले उचलली आहेत. १९८६ पासून सुरू झालेल्या या प्रवासात अनेक अडथळे आले, पण डीआरडीओने हार मानली नाही. त्यांनी ड्राय व्हेरिएंट विकसित करून ४९-५१ kN थ्रस्ट निर्माण करणारे इंजिन तयार केले. रशियात झालेल्या ७० तासांच्या फ्लाइट ट्रायल्सनंतर आता सर्व महत्त्वाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तरीही भारताकडे स्वतःची फ्लाइट टेस्टिंग सुविधा नसल्याने विलंब होतो. ही पायाभूत सुविधा उभारणे ही पुढील मोठी गरज आहे. कावेरी इंजिनची ही यशस्वी पायरी म्हणजे आत्मनिर्भर संरक्षण तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
समस्त मराठी बंधु भगिनींना मराठी नववर्ष चैत्र प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्या निमित्ताने या दिवसाची महती सांगणार्या एका ऐतिहासिक स्तंभाची ओळख करून घेऊ. सातवाहन साम्राज्याचा पराक्रमी सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याने नाशिक परिसरात शकांचा पराभव करून त्यांचे साम्राज्य संपवले. या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ पैठण येथे विजयस्तंभ उभारला गेला, जो आज ‘तीर्थस्तंभ’ म्हणून ओळखला जातो. सुमारे ५० फूट उंचीचा हा स्तंभ यादवकालीन शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे. त्याच्या रचनेत स्वर्ग, मृत्युलोक आणि पाताळ यांचे प्रतीकात्मक दर्शन घडते. मातृकामंडळाचे कोरीवकाम, भैरवाचे गूढ संकेत, मैथुनशिल्पे आणि देवी-गणेशाच्या मूर्ती या शिल्पकलेच्या दुर्मिळ शैलीचे दर्शन घडवतात. गोदावरीकाठच्या पैठणला ‘मोक्षधाम’ मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणारे शालिवाहन शक नववर्ष या विजयाशी जोडलेले आहे. आजही हा स्तंभ इतिहासाचा जिवंत साक्षीदार ठरतो.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
राजकीय नेते कामाला लागले. घोटाळे करायला सुरुवात झाली !!! श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे ४ हजार एकर शेती महामंडळाची जमीन ZR 2 Bio Energy कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू होती. या व्यवहारामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. त्यांनी दावा केला की कंपनीच्या खात्यात अवघ्या एका महिन्यात १०० कोटी रुपये जमा झाले असून हा पैसा हवाला मार्गाने आला असण्याची शक्यता आहे. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ZR 2 कंपनी दुबईत नोंदणीकृत असून मुंबईत कार्यालय आहे. या कंपनीचे संचालक म्हणून राधाकृष्ण विखे-पाटलांचे जावई अजित ढोकणे आणि मुलगी सुप्रिया विखे यांची नावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या व्यवहाराची सखोल चौकशीची मागणी होत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काँग्रेस सतत आरोपांची मालिका करत आली – राफेल, सीएए, एनआरसी, व्होटचोरी, अगदी गॅस जहाजं अडकली वगैरे. पण भाजपची फळी हे आरोप तात्काळ परतवून लावते. राफेल नदालसारखं ग्राउंड कव्हर, फेडररसारखा फोरहँड आणि जोकोविचसारखा विजयाचा हात उंचावणं – असा खेळ दिसतो. भाजपने केलेले आरोप मात्र संघटित होते. राष्ट्रकुल, कोळसा, टूजी, आदर्श, पाटबंधारे – या घोटाळ्यांनी युपीएला घरी बसवलं. आरोप खरे की खोटे यात न शिरता, काँग्रेसकडे प्रत्युत्तर देणारे ‘खेळाडू’च नव्हते हे स्पष्ट झालं. आज नॅरेटिव्हचा खेळ असा झाला आहे की एक संघ बास्केटबॉल खेळतोय, तर दुसऱ्याचा बॉल बास्केटमध्ये जाऊ नये म्हणून त्याच्याच बास्केटवर माणसं बसवली आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकेत ३०० बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक करून नवी रिफायनरी उभारत आहे. पन्नास वर्षांनंतर अमेरिकेत उभी राहणारी ही पहिली रिफायनरी आणि ती भारतीय कंपनीकडून उभारली जाणे ही अभिमानाची बाब आहे. धीरुभाई अंबानी यांनी जामनगर रिफायनरी उभारताना घेतलेला निर्णय आजही उद्योगजगतात आदर्श मानला जातो. स्वस्त पण सल्फरयुक्त तेल वापरण्याचा त्यांचा विचार सुरुवातीला धाडसी वाटला, पण त्यातूनच जगातील सर्वात कॉम्प्लेक्स रिफायनरी उभी राहिली. ही दूरदृष्टी म्हणजेच खरा बिझिनेस ॲक्युमेन. आज रिलायन्सची जामनगर रिफायनरी जागतिक स्तरावर मान्यता मिळवते. अमेरिकेतील गुंतवणूक ही त्याच परंपरेचा विस्तार आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी अंबानी-अदानींचा द्वेष न करता त्यांच्या व्यावसायिक कौशल्यातून शिकायला हवे. तेव्हाच मराठी माणूस उद्योगधंद्यात पुढे राहील
🔽








Comments