भारतीय जनता पार्टी, मुंबईची संघटन पर्व सदस्यता अभियान संदर्भातील महत्वाची आणि विशेष बैठक गोरेगाव पश्चिम येथील हॉटेल रेडिसन मध्ये सदस्यता अभियानाचे मुंबईचे प्रमुख सुनील राणे व सहसंयोजक अमरजीत मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीला मुंबईच्या सहा जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्ह्यांचे प्रमुख व मुंबई सक्रिय सदस्य अभियानाचे जिल्ह्याचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये सदस्य अभियानाचे जिल्ह्याचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये सदस्य अभियानाचे 20 लाखांचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले. या उद्दिष्टापैकी 12 लाख 70 हजार सदस्यांचे ऐतिहासिक नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच सक्रिय सदस्यता अभियानावर जोर देण्यासंदर्भात चर्चा या बैठकीत पार पडली.
भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये सदस्यता अभियानाचे काम पूर्ण करण्याचे सर्व सदस्यांनी तयारी दर्शवली. लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होत असताना संघटनेमध्ये ही मुंबईने आपले लक्ष पूर्ण करण्यासाठी तयारी व आखणी केल्याची माहिती सदस्य अभियानाने प्रमुख सुनील राणे यांनी दिली.









Opmerkingen