top of page

बाॅलीवुड मुंबई मधून गेल्याने फरक पडणार नाही ...

dhadakkamgarunion0

@ABHIJEETRANE(AR)

उद्धव ठाकरे सोडून महाराष्ट्राच्या प्र त्ये क मुख्यमंत्र्यांनी केवळ इतर राज्यांत नव्हे तर परदेशात जाऊन महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी तेथील उद्योगपतींना आवाहन केले केले केले...

मग योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन उद्योग धंदे व्यापार व्यवसाय सुरू करण्यासाठी "उत्तर प्रदेशमध्ये या" असे आवाहन केले तर बिघडले कुठे?

www.abhijeetrane.in



 

🖋️ @ABHIJEETRANE(AR)

बाॅलीवुड मुंबई मधून उत्तर प्रदेशात गेले तर बरेच होईल.. एकतर मराठी चित्रपटांना स्टुडिओ परवडणा-या दरात उपलब्ध होतील आणि आणि आणि... गंजडे नशिडे चरसी व्यभिचारी भ्रष्ट नतद्रष्ट अंडरवर्ल्डशी संबंधित बाॅलीवुडची "गंदगी" महाराष्ट्रातून मुंबई मधून कायमची समूळ सामूहिकरित्या जाईल तर बरेच होईल! उद्धवजींनी "बाॅलीवुड मुंबई बाहेर जाऊ देणार नाही" म्हणण्यापेक्षा "खुशाल चालते व्हा" अशी भूमिका घेतली पाहिजे !

www.abhijeetrane.in


 

🖋️ @ABHIJEETRANE(AR)

उर्मिला मातोंडकरचा शिवसेना प्रवेश शिवसेनेच्या नव्या सेक्युलर भूमिकेशी सुसंगत आहे.. आई मुसलमान, एक वडील हिंदू पण सेक्युलर समाजवादी, सावत्र वडील कट्टर हिंदुत्ववादी, नवरा पाकिस्तानात जन्मलेला काश्मिरी मुसलमान, निकाह आणि विवाह अशा दोन्ही पद्धतीने लग्न, लग्नानंतर पतीचे आडनाव कागदोपत्री पण सार्वजनिक जीवनात मातोंडकर हे सख्या वडिलांचे आडनाव लावून "मराठी मुलगी" ही इमेज कायम ठेवलेली !!! यापेक्षा अधिक सेक्युलर पर्सनॅलिटी ती काय असणार? 288 मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत नुसते हळदी कुंकू समारंभ केले तरी पुरेसे आहे. शिवाय मुस्लिम महिला मेळाव्यात बुरखा घेऊन जाण्याची सोय आहे. अशी सेक्युलर महिला तर भाजपा कडे सोडाच पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडे सुद्धा नाही !!

www.abhijeetrane.in


 

🖋️ @ABHIJEETRANE(AR)

बाॅलीवुड मुंबई मधून गेल्याने फरक पडणार नाही कारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर फिल्मस् आणि सिरियल्स हजारोंच्या संख्येने येत आहेत त्यांना आज स्टुडिओ टेक्निशियन कामगार बॅकस्टेज वर्कर्स आज आहेत त्याच्या दहा वीस पट अधिक लागणार आहेत. बाॅलीवुड गेल्याने स्टुडिओंचा काळाबाजार आणि तंत्रज्ञांची टंचाई कमी होईल. शिवाय टीव्ही सिरियल्स हजारोंच्या संख्येने येत आहेत त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चर उपयोगी पडेल. परदेशात शूटिंग आणि प्रोसेसिंग केले तर चालते पण पण पण देशात.. दुस-या प्रदेशात केले तर आक्षेप घेतला जातो हे विसंगत नाही का? उत्तर प्रदेश मध्ये ज्या सोयी सुविधा सवलती आदित्यनाथ देणार त्या महाराष्ट्रात दिल्या तर चंगळ चैन मौजमजा मस्ती ऐय्याशी नशेखोरी स्वैराचार याला मुक्त मनसोक्त वाव देणारी मुंबई आणि तिचे नाईट लाईफ सोडून कशाला बाॅलीवुडवाले सोवळ्या सनातन परंपरावादी कडव्या धर्मलंड महंत पंडित यांच्या नजरकैदेत जातील? मुंबईत करतात तो स्वैराचार, व्यभिचार, गैरव्यवहार, गैरप्रकार बाॅलीवुडवाल्यांना उत्तर प्रदेश मध्ये कोण करू देईल? बाॅलीवुडवाल्यांना मुंबई ही मायानगरीच मोहनगरी वाटणार.. शिवाय मुंबईत आदित्य ठाकरे यांच्यासारखे "नाईट लाईफ"चे पुरस्कर्ते 'पालक'मंत्री आहेत ज्यांचा मित्र परिवार हेच बाॅलीवुड स्टार आहेत. उत्तर प्रदेशात स्टुडिओ टेक्निशियन कामगार बॅकस्टेज वर्कर्स मिळतील पण आदित्य ठाकरे यांच्या सारखा उदारमतवादी पुरोगामी अत्याधुनिक फॅशन आणि फिल्म्स हा पॅशन असलेला आणि मुंबईचे "लास व्हेगास" करण्याचे स्वप्न पहाणारा एक तरी जोशिला जवान मंत्री उत्तर प्रदेशात मंत्री असेल का?

www.abhijeetrane.in


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page