top of page

बीड जिल्ह्यात आयएएस तुकाराम मुंडे...

  • dhadakkamgarunion0
  • Jun 9
  • 2 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

बीड जिल्ह्यात आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीए आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या कठोर कारवाईच्या भीतीने अनेक हॉटेलमधून पनीरचे पदार्थ अचानक गायब झाले आहेत. कार्यारंभ दैनिकानुसार, पनीर, पनीर चिल्ली, पनीर तडका, पनीर मसाला यांसारख्या भाज्या मेन्यूमधून हटवल्या गेल्या आहेत. चीज, दूध, लस्सी, मसाला दूध, रबडी, बासुंदी यांचेही स्टॉल्स बंद झाले आहेत. दूध संकलन घटल्याने मोठ्या दूध माफियांवर दबाव वाढला आहे. या परिस्थितीत नागरिकांना आजवर मिळणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे. तुकाराम मुंडे यांच्या मोहिमेमुळे भेसळखोरांवर कठोर कारवाई होत असून, बीडमध्ये खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम दिसून येतो आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

दिल्लीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील उरलेली तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा रंगली आहे. जर हे घडलं, तर त्याचं स्वागत व्हायलाच हवं. महाराष्ट्रातील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर फुटीर गटांनीही पुन्हा काँग्रेसमध्ये सामील व्हावं, अशी अपेक्षा आहे. भाजपने बहुतेक प्रादेशिक पक्ष संपवले, पण काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे जो संपवता येत नाही. त्यामुळे काँग्रेसला बळकट करणे ही काळाची गरज आहे. देशात खंबीर विरोधक असणे आवश्यक आहे आणि आजच्या घडीला तो पर्याय फक्त काँग्रेसच आहे. विरोधक मजबूत असतील तर लोकशाहीही मजबूत राहील. अशा विलिनीकरणाने राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला नवसंजीवनी मिळू शकते आणि विरोधक म्हणून तिची भूमिका अधिक ठळक होऊ शकते.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर छगन भुजबळ उत्सुक होते, पण त्यांनी पुतण्या समीरसाठी मंत्रीपदाची अट घातली. पंकज भुजबळ आधीच विधानपरिषदेत गेलेले, तर समीरला विधानसभा पोटनिवडणुकीत उतरवून मंत्री करण्याचं गणित होतं. मात्र भाजपने अटीला विरोध केला आणि राष्ट्रवादीकडे पर्याय उरला नाही. नवनीत राणाही इच्छुक होत्या, पण शेवटी राजेंद्र जैन यांना खासदारकी मिळाली. धनंजय मुंडे पुन्हा वेटिंगवर राहिले. भुजबळांची अट मान्य झाली असती तर तटकरेंप्रमाणेच घराणेशाहीचा चेहरा दिसला असता, पण ते शक्य झालं नाही. राजकारणात नेत्यांचं कुटुंब पहिली प्रायोरिटी असतं, मात्र कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं की खऱ्या धाडसानेच आमदार, खासदार, मंत्रीपद मिळतं—घराणेशाहीला ढोपराने बाजूला सारून.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

आपल्या संस्कारांमध्ये पाहुण्याला पाणी, भुकेल्याला खायला देणे हेच महत्त्वाचं. पोस्टमन, डिलिव्हरी बॉय आले तरी आपण आदराने वागतो. सोसायटीत लहान मुलं अनवाणी खेळतात, जैन मुनी अनवाणी चालतात—मग पट्टे फक्त त्यांच्यासाठीच का? देवळातही पाय धुण्याची व्यवस्था असते, सुवर्ण मंदिरात तर पायरीपुढे पाणी सोडलेलं असतं. पण काही लोकांना उगाच इश्यू बनवायची हौस असते. हेच लोक घराजवळ दिवसातून पाच वेळा भोंगा वाजला की कानात कापूस घालून बसतात, कारण त्यावर व्हिडीओ बनवला तर श्रवणयंत्र लावायची वेळ येईल. खरं तर साध्या गोष्टींमध्येही आदर, संस्कार आणि सहजीवनाचं सौंदर्य आहे, पण काहींना वाद निर्माण करण्यातच आनंद मिळतो.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

ही आहे अंजना ओम कश्यप—१८ वर्षांची पत्रकारिता, ३४ लाखांचा पगार आणि ५५ कोटींची संपत्ती. पण NEET घोटाळ्यात त्यांनी कधीच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, मोदींना दोष दिला नाही. आता मात्र ‘टू-पेनी’ टिप्पणीवरून त्या २ कोटींची नुकसानभरपाई मागत आहेत. काल त्यांनी खान सर, अभिनव शर्मा, बबिता आणि इतर शिक्षकांविरुद्ध स्वतःहून खटला दाखल केला. आश्चर्य म्हणजे, ज्या माध्यमांना जनतेचा आदर नाही, ती मानहानीचे खटले दाखल करत आहेत. पत्रकारिता शून्य, नाटक शंभर टक्के—असा हा प्रकार. जनतेच्या प्रश्नांवर मौन, पण स्वतःच्या अपमानावर कोर्टात धाव. हेच आजच्या TRP-चालित पत्रकारितेचं वास्तव आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page