*@ABHIJEETRANE(AR)*
तुलना कोणाची कशा संदर्भात हे संदिग्ध ठेवून फक्त एवढेच म्हटले की :
बेडकी कितीही फुगली तरी बैल होऊ शकत नाही ..
पाल कितीही मोठी झाली तरी मगर होऊ शकत नाही..
बुलडाॅग कितीही आक्रमक झाला तरी वाघ होऊ शकत नाही..
तर.. चूक की बरोबर ?
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE(AR)*
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना 'युपीए'चे अध्यक्ष करण्यापेक्षा एकतर राष्ट्रवादी काँग्रेस गांधी परिवार संचलित अ.भा. काँग्रेस मध्ये विलीन करून घेत अ.भा. काँग्रेसचेच अध्यक्षपद शरद पवार साहेबांना देण्यासाठी गांधी परिवाराने का पुढाकार घेऊ नये?
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE(AR)*
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तान यांची चिथावणी असल्याचा आरोप केला म्हणून निषेध मोर्चे काढणा-यांनी "आज तक" "इंडिया टीव्ही" "रिपब्लिक" असे सुमारे .. शंभर.. शंभर.. होय ! होय !.. किमान शंभर न्यूज चॅनल्स चीन आणि पाकिस्तान यामागे असल्याचा आरोप रात्रंदिवस करीत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. दानवे यांनी त्याच ब्रेकींग न्यूजचा संदर्भ देत ते विधान केले होते!
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE(AR)*
भारतात लसीकरण सुरू झाल्यावर माझ्या अंदाजाप्रमाणे प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडीयावर कोरोना लसीमुळे काही उपयोग होत नाही इथपासून दुष्परिणाम होतात इथपर्यंत अनेक प्रतिकूल अफवा आणि अपप्रचार यांचा प्रचंड गदारोळ उठवला जाईल ज्यामुळे काही कोटी भाबडे गरीब अज्ञानी जनसामान्य ही लस घेण्यापासून परावृत्त होतील आणि मक्तेदार उच्चभ्रू वर्गाला लस सहज सुलभ आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल ! लिहून / सेव्ह करून ठेवा हा मेसेज !
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE(AR)*
दिल्लीभोवतीचा वेढा सहा महिने चालविण्याची धमकी देणा-या शेतकरी नेत्यांना आठवण करून देतो की इतिहासात एकाद्या किल्ल्याला किंवा दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरांना शत्रूने वर्ष सहा महिने फक्त नव्हे तर दोन तीन वर्षे वेढा घालून नाकेबंदी केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्या काळात जर असे प्रदीर्घ काळासाठी वेढे घातले तरी किल्ले लढविले जात होते तर आता वेढ्यातील दिल्लीला सर्व प्रकारच्या वस्तू पदार्थ आणि "रसद" हवाईमार्गाने पुरवून "जिवंत" ठेवता येईल. दिल्लीबाहेरून महामार्गावरून रोजीरोटीसाठी येणा-या जन
सामान्यांची आठ महिन्यांच्या लाॅकडाऊनच्या काळात झाली तशी कोंडी पुन्हा होईल पण तेव्हा देखील लोकांना उपाशी मरावे किंवा आत्महत्या कराव्या लागल्या नव्हत्या. दिल्लीबाहेरून महामार्गावर वेढा घालून नाकेबंदी करणा-या पंजाब हरियाणा अशा राज्यातील आणि राज्यांशी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आहे हे कारण देऊन केंद्र सरकार राजमार्ग, रेल्वे, हवाई वाहतूक आणि इंधन पुरवठा दिल्ली भोवतीचा वेढा उठत नाही तोपर्यंत बंद करून त्या राज्यातील सरकारे आणि जनतेची दिल्लीकरांविरूद्ध आंदोलकांनी केली आहे तशी कोंडी करून दबाव निर्माण करू शकते. आंदोलक हिंसाचार न करता कोंडी करीत आहेत आणि केंद्र सरकार दिल्ली शहराच्या कोंडीला पंजाब हरियाणा ची रसद तोडून उत्तर देऊ शकते.
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE(AR)*
सोनिया आणि राहुल गांधी यांना काँग्रेस पक्ष सांभाळता येत नाही आणि ती जबाबदारी घेण्याची किंवा काँग्रेस पक्षांतर्गत नव्या नेतृत्वाला पक्ष सोपविण्याची इच्छा नाही हे निर्विवाद सत्य आहे मग शरद पवार साहेबांनी निदान युपीए आघाडीचे नेतृत्व करून सर्व विरोधी पक्षांची आगामी विधानसभा / लोकसभा निवडणुकांसाठी मोट बांधून भाजपाला पर्याय द्यावा या सूचनेत गैर काय आहे? सूचना कोणाचीही असो.. स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातील स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या प्रतिकूल मताला गांधी परिवार तरी किंमत देईल का? अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी लागणारी बुद्धीमत्ता, गुणवत्ता, चतुरस्र कर्तृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले दोनच नेते महाराष्ट्रात आहेत.. 1) शरद पवार साहेब 2) देवेंद्रजी फडणवीस..!! फडणवीसांना दिल्लीला जाण्याआधी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून राज्याची घडी बसवायची आहे. शरद पवार साहेबांना आता केंद्रीय सत्ता नाही मिळवता आली तरी निदान विरोधी पक्ष नेते म्हणून देशव्यापी प्रतिमा, प्रभुत्व आणि नेतृत्व मिळत असेल तर नकारात्मक भूमिका कशाला घ्यायची?
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE(AR)*
भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेशी युती करून जागा वाटपात हिस्सेदारी देण्याची नौबत ओढवून घेण्यापेक्षा मनसेला भाजपा विरोधात भूमिका घ्यायला लावून पण सर्व जागी उमेदवारांना उभे करण्यासाठी मदत देऊन भाजपा विरोधी मते फोडण्यासाठी वापरावे ही उत्तम मांडणी होईल. मनसे भाजपा विरोधात राहिली तरच महापालिका निवडणुकीत शिवसेनेची मराठी मते फोडू शकते अन्यथा मराठी पण भाजपा ला प्रतिकूल मतदार एकगठ्ठा शिवसेनेला मतदान करतील. अससुद्दीन ओवैसींची एम आय एम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला विरोधात ताकद देऊन भाजपाला महाराष्ट्रात आणि अलीकडे बिहार मध्ये निवडणुकीत यश मिळवता आले हे यशस्वी समीकरण समोर असताना निवडून येण्यापेक्षा भाजपा विरूद्ध उमेदवार पाडण्याची क्षमता अधिक असलेल्या मनसेला स्वतंत्र पण रसद पुरवून लढवणे इष्ट ठरेल असे मला वाटते. बिहारमध्ये चिराग पासवानने भाजपा नेत्यांच्या सल्ल्यानुसार फक्त नितीश कुमार यांच्या उमेदवारांच्या विरोधात नितीश कुमार भाजपा सोबत असताना उमेदवार उभे केले आणि नितीश कुमार यांच्या 30/35 उमेदवारांना पाडले. तसेही मनसेला भाजपा विरोधात उमेदवार उभे न करता फक्त शिवसेनेच्या उमेदवारांविरूद्ध लढायचे पण भाजपा उमेदवारांना पाठींबा द्यायचा अशी भूमिका घेता येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ नव्हे तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा "डबल गेम" मनसेच्या माध्यमातून भाजपा वाजवू शकते.
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE(AR)*
बंगाल मध्ये निवडणुकीच्या आधी वर्ष - सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भाजपा बहाणे शोधत आहे हे स्पष्ट दिसत असताना ममता बॅनर्जी यांनी तसे करण्यासाठी केंद्र सरकारला भरपूर कारणे मिळतील अशी पावले टाकली आहेत.. महाराष्ट्रात मुदतपूर्व मध्यावर्ती निवडणुकीआधी आणि बंगालमध्ये रितसर निवडणुकी पुर्वी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येणार येणार येणार हे लिहून ठेवा. दोन्हीकडे कारणे अर्थात वेगवेगळी असतील. बंगाल मध्ये बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था तर महाराष्ट्रात महाआघाडी सरकारला घटक पक्षांच्या अंतर्विरोधामुळे आलेली अस्थिरता हे कारण असेल.
www.abhijeetrane.in
Comments