top of page
dhadakkamgarunion0

प्रश्न कोणाला ? उद्धवजींना !!

*ABHIJEET RANE (AR)*

वाझे प्रकरणातील मूळ मुद्द्याला हात घालणारे स्फोटक आणि अचूक मर्माघात करणारे विधान राज ठाकरे यांनी केले आहे.. ज्यावर केंद्र सरकारकडून कारवाई झाली तर खरोखरच फटाक्यांची माळ लागेल.

ते विधान:

"अंबानी यांच्या घरासमोर गाडी आणि जिलेटीन कांड्या कोणाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आली ?"

दुसरे महत्त्वपूर्ण विधान:

परमवीर सिंग यांची बदली का केली याचा सरकारकडून खुलासा का नाही ?

जबरदस्त!


 

*ABHIJEET RANE (AR)*

फरशी पुसता पुसता टीव्हीवरील न्यूज चॅनेलवरील बातमीवर नजर टाकीत माझी कामवाली बाई म्हणाली..

"साहेब, रस्त्यावरच्या वडापाववाल्यापासून अंबानीपर्यंत कुणालाच सोडलं नाही बघा यांनी !"

सामान्य माणसाची असामान्य प्रातिनिधिक प्रतिक्रिया ?


 

*ABHIJEET RANE (AR)*

प्रश्न कोणाला ? उद्धवजींना !!

काय ?

जर रात्रंदिवस , वारंवार , पुनःपुन्हा तुम्हीच..

मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि कोरोना "टाळा"..

असे आवाहन करता तर तर तर..

आदित्य ठाकरे यांना कोरोना कसा झाला ?

आदित्यनीच तुमचे आदेश पाळले नाहीत

की

मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग पाळून देखील कोरोना होतो

हे तुम्ही आता कबूल करणार ??

तसे असेल तर मग मास्क सॅनिटायझर डिस्टन्सिंग या तुमच्या आवाहनाला जनतेने किती गांभीर्यपूर्वक घ्यायचे ??


 

*ABHIJEET RANE (AR)*

अनेक अनेक अनेक आजी माजी मंत्री माझे मित्र आहेत.

त्यांच्याशी 'ऑफ दि रेकॉर्ड' गप्पांमध्ये जेव्हा ते जे कोट्यावधी रूपये अधिकाऱ्यांकडून दरमहा किंवा एकेका प्रकरणात भ्रष्टाचाराने गोळा करतात त्याचा विषय निघाला की ते अनौपचारिक मोकळेपणाने सांगायचे / सांगतात की "जेव्हा अधिकाऱ्यांकडून आम्हाला शंभर रूपये मिळतात तेव्हा अधिकाऱ्यांने स्वतःचे दहा ते वीस रूपये आधीच वेगळे वसूल केलेले असतात. अभिजीत, आमच्यापर्यंत पोचतात ते शंभर रूपये एकट्या आम्हाला मिळतात हा गैरसमज मनातून काढून टाक. पन्नास रूपये म्हणजे पन्नास टक्के आम्ही "पक्ष निधी"साठी या गोंडस नावाखाली 'बाॅस'ला पोचवतो. आणखी पंचवीस टक्के "पॅरलल बाॅस"ला द्यावे लागतात. आमच्या वैयक्तिक वाट्याला शंभर पैकी पंचवीस रूपये किंवा टक्के येतात. आमच्या वरकमाईचे हिशेब आणि क्लिअर केलेल्या फाईलींची तपशीलवार फाईलींची माहिती संकलित करून बाॅस ना देणारी खास माणसे मंत्रालयात पेरलेली असतात. जसे इन्स्पेक्टरला वाटा दिल्याशिवाय हवालदार हप्ता घेऊ/ पचवू शकत नाहीत किंवा एसीपी , डिसीपी, कमिशनर असे वर्तुळ पूर्ण केल्याशिवाय खात्यात काही व्यवहार होऊच शकत नाहीत तसे कोणताही मंत्री "वरच्यां"ना वगळून "खालच्या खाली" परस्पर बाॅस ना अंधारात ठेवून तोडपाणी करूच शकणार नाही. महापालिकेत जर वाॅर्ड ऑफिसर जेव्हा शंभर रूपये खातो तेव्हा त्यांचा बाॅस पन्नास रूपयांची ढेकर देतो आणि मधल्या साखळीतील प्रत्येक सांध्याला त्याच्या उपयुक्तता व उपद्रव मूल्यानुसार "ऑईलिंग" केलेले असते.

टीप: ही सर्व माहिती मला आजी माजी मंत्र्यांनी दिली आहे तरी कायदेशीर सोय म्हणून मी संविधानक इशारा इथे नमूद करतो की या प्रकाराला अपवाद आहेत आणि मी कोणत्याच पदाचा, पक्षाचा किंवा नावाचा उल्लेख केलेला नाही.


 

*ABHIJEET RANE (AR)*

एका रात्रीत भूमिकेत बदल करून खलनायक ते नायक.. व्हिलन ते हिरो हा "सुपर्ब काॅप"चा प्रवास अभूतपूर्व आणि थक्क करणारा आहे. "ज्यां"नी कालपर्यंत "त्यां"ना विविध "कांडां"चे सूत्रधार म्हटले "ते"च आता "त्यां"नी केलेल्या आरोपांचा आधार घेऊन गदारोळ उठवीत आहेत तर कालपर्यंत "त्यां"ना "कॅरॅक्टर सर्टिफिकेट" देणारे "त्यां"चे चारित्र्यहनन करून विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. तुम्ही जनसामान्य काय करणार ? सायलेंट स्पेक्टॅटर.. मूक साक्षीदार.. म्हणून आपल्या निष्क्रिय भूमिकेतून "ठेविले साहिबे , तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे, वांझ (अ)समाधान" याशिवाय तुम्हाला तरी काय पर्याय आहे ?


 

*ABHIJEET RANE (AR)*

सकाळच्या वेळात रोज आठ दहा राजकीय नेते, अधिकारी, पत्रकार यांच्याशी फोनवर अनौपचारिक बोलून मी स्वतःला "अपडेट" करीत असतो. आत्ताच एक किस्सा घडला. एका माजी मंत्र्यांशी बोलत होतो तर मी विचारले की " तुम्ही कितीतरी वर्षे मंत्री होता मला सांगा.. "वरच्या"ला "हिस्सा" दिल्याशिवाय "खालचा" खाऊ शकतो काय? मग तो हवालदार असो अथवा मंत्री !" माझे मित्रवर्य असलेले मंत्रीवर्य खुसखुशीत हसले.. म्हणाले.. "अभिजीत, तुम्ही माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले ऐकलेत काय? नाही ना ? मला काय पक्षनिष्ठा नावाखाली पैसे द्यावे लागले नसतील? मी दिले. कोट्यावधी रूपये दिले. पण मी एक आयडीया केली. मी निरनिराळ्या कंपन्यांकडून सीएसआर फंडातून "माननीयां"च्या विविध ट्रस्टस् साठी चेकने लाखो रूपये घेऊन द्यायचो. वस्तू , वास्तू , वाहने घेण्यासाठी "महनीयां"च्या रजिस्टर्ड पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टस् ना इतक्या वर्षांच्या माझ्या मंत्रीपदाच्या काळात मी किमान शंभर कोटी रुपयांवर देणग्या मिळवून दिल्या असतील. "महनीयां"च्या ट्रस्ट अकाउंटवर देणगी जमा झाल्याची पावती दाखविल्याशिवाय मी फाईलवर सहीच करीत नसे. त्यामुळे माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही आणि "श्रेष्ठी"ही संतुष्ट राहिले. "

टीप: कोणत्या विशिष्ट कालखंडात हे माझे मित्रवर्य मंत्री होते हे मी लिहिलेले नसल्यामुळे कृपया ही हकिगत कुणी कुणावर शंका घेऊन वाचू नये हा संविधानक इशारा)


3 views0 comments

Comments


bottom of page