◆
*ABHIJEET RANE (AR)*
प्रत्येक सरकार ला किंवा सरकार चा म्हणून एक "चेहरा" असावा / दिसावा लागतो. महाआघाडी सरकारचा "चेहरा" कोण? कोण? कोण? उद्धव ठाकरे की अजित पवार ? एक अति शीत.. दुसरा अति उष्ण ? एक निर्विकार .. दुसरा स-विकार ! दोघेही महाआघाडी सरकारचे "प्रातिनिधिक" वाटत नाहीत. मग कोण ? तुमचे मत नोंदवा.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
"भारताला त्याचे "गतवैभव" मिळवून द्यायचे आहे"
अशी भाषा जे संघ परिवार सदस्य वापरतात ..
त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की:
"हे गत-वैभव कोण उपभोगत होते" ?
दलित शोषित वंचित पीडित आदिवासी समाज या "गत-वैभवा" चा भाग कुठे होते ? नव्हतेच !
मग संघ परिवाराच्या "गत वैभव" भारताला परत एकदा मिळवून देण्यासाठी.. भाजपा च्या माध्यमातून.. प्रयत्न करण्याच्या संकल्पनेचे 'अपील', आकर्षण "आज"च्या बहुजन समाजाला का वाटेल..?
उलट या "गत-वैभवा" च्या कालखंडात दलित आदिवासी, मागासवर्गीय बहुजन समाजाचे.. आर्थिक, शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, वैचारिक शोषण झाले आणि या तथाकथित "वैभवा" पासून.. त्यांना जुलूम जबरदस्तीने, दहशतीने, रुढी -परंपरा -घर्म- कर्म-कांड यांच्या कठोर "दुराचार" संहितेच्या .. "मनुस्मृती"च्या.. आधारे दूर ठेवून.. बळ वापरून छळ केला.. हे सत्य नाही काय?
"गत-वैभवा"च्या संकल्पनेचे 'अपील' , आकर्षण तथाकथित उच्च वर्णीय आणि उच्च वर्गीय.. "आहे रे".. श्रेणीतील मक्तेदारांना वाटू शकते..
बहुजन समाजाला.. नाही ! नाही ! नाही !!
◆
*ABHIJEET RANE (AR)*
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या "विपने" देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता.. बाकी बहुतेक नेते.. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास शिवसेनेच्या दगाबाजी मुळे गेला या प्रक्षोभ आणि वैफल्यातून दीड वर्ष होऊनही बाहेर पडलेले नाहीत.. त्यामुळे तोल सोडून, चिरडीला येऊन, अतिरिक्त आवेशात आणि सूडबुद्धीने पेटल्या सारखे बोलतात.. खरे खोटे आरोप बिनबुडाचे आहेत हे ठाऊक असूनही बिनदिक्कतपणे करतात.. मग या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला धारेवर धरतात पण शिवसेना वगळता अन्य कौग्रेस किंवा राष्ट्रवादी नेत्यांना अनिल देशमुख यांच्या सारखा अपवाद वगळता 'टार्जेट' करीत नाहीत याचे कारण, रहस्य हे आहे की : देवेंद्रजींना ही जाणीव आहे की 'उद्या .. मुदतपूर्व निवडणुका टाळून सरकार स्थापन करायचे असेल तर कांग्रेस आमदार फोडून आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना जोडून ते करावे लागेल म्हणून एका मर्यादेपलीकडे देवेंद्रजी कांग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना किंवा आमदारांना डिवचून वैयक्तिक शत्रूत्व घेत नाहीत पण हे वास्तववादी भान इतर डझनभर भाजपा नेत्यांना नाही त्यामुळे ते बख्खळ , बाष्कळ बडबडून अन्य महाआघाडी सरकार मधील नेत्याशी गैरवाजवी आणि अनावश्यक वैर घेऊन भाजपा च्या देवेंद्र फडणवीस यांनी आखलेल्या सत्तांतराच्या व्युहरचनेला छेद देत निष्कारण अडथळा निर्माण करतात असे मला वाटते.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
आदित्य ठाकरेंच्यावरील आरोपांचा त्यांनी गेल्या दीड वर्षात कधीच खुलासा केला नाही. सुशांत सिंग ते दिशा सैलीयन आणि नाईट लाईफ ते आरे कॉलनीतील मेट्रो प्रकल्प या सर्व गोष्टींना मिडीयाने स्कैम आणि स्कैडल चे स्वरूप दिले. आदित्य ठाकरेंच्या समर्थकांनी, सल्लागारांनी इतकेच नव्हे मिडीयाने आदित्य ठाकरे यांनी खुलासा करावा असा आग्रह धरलेला होता पण आदित्यनी कटाक्षाने टाळले. आज मला जाणवते आहे की .. आदित्य ठाकरेंची ही स्ट्रैटेजी १००% यशस्वी ठरली. उलट सुलट चर्चा, आरोप प्रत्यारोप काळाच्या ओघात लुप्त झाले आणि बदनामी मोहीम बारगळली. आता आदित्य ठाकरेंच्या इमेज बिल्डिंग आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट मिडिया मैनेजमेंट कंपन्यांनी आपल्या आक्रमक भूमिकेतून आणि 'ह्यूज' असे १०० कोटी रुपयांचे बजेट घेऊन जो पौझिटीव्ह कैम्पेन राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू केला आहे तेव्हा आधीच्या काळातील कोणत्याही कान्ट्व्हर्सींची छाया अडथळा निर्माण करीत नाही आहे. आदित्य ठाकरेंच्या इमेज बिल्डिंग आणि परफौर्मन्स अपलोडींग मुळे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा तयार होऊ लागली आहे. आता मलाही वाटते आहे की : बरे झाले.. दीड वर्ष आदित्य ठाकरे खुलाशांच्या भानगडीत पडले नाहीत.. पब्लिक मेमरी इज शौर्ट .. आता नव्याने आदित्य ठाकरेंच्या कडे महाराष्ट्रातील जनता वेगळ्या दृष्टीने , आशेने, प्रतिमेने पाहू लागली आहे . अभिनंदन आदित्य ठाकरे.. आधी संयमाचे.. आता टायमिंग साधून पब्लीसिटी कैम्पेन करण्यासाठी !!
◆
*ABHIJEET RANE (AR)*
वैतागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार साहेबांना सांगितले की:
"सरकार टिकवणे ही फक्त माझी किंवा शिवसेनेची जबाबदारी नाही .. कांग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मतभेद आणि आपसातील भांडणे जाहीरपणे व्यक्त करुन महाआघाडी सरकार अस्थिर आणि कधीही कोसळेल असे वातावरण निर्माण करु नये"
उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली खंत, व्यथा खरी आहे पण याची सुरुवात शिवसेनेचे मुखपत्र "सामना" आणि प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी मिडीयातून आणि मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांतील 'अर्थ'कारणात हस्तक्षेप करून केली हे कसे नाकारता येईल ? आधी खोड शिवसेनेच्या नेत्यांनी काढली .. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते तोच कित्ता गिरवत शिवसेनेची, सरकारची, उद्धव ठाकरे यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगून धडा शिकवित / गिरवीत आहेत. महाभारतातील कृष्णाने कर्णाला विचारले होते की : अभिमन्यूला दगाबाजीने मारलेत तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म .. ज्याची आज तू मला आठवण करून देत आहेस " हाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना शरद पवार साहेबांनी विचारला असता तर ..? खरे म्हणजे विचारायला हवा होता !!
댓글