पेपरलेस मंत्रिमंडळाची पहिली पायरी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारातून
- dhadakkamgarunion0
- Jun 26
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पेपरलेस मंत्रिमंडळाची पहिली पायरी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारातून
● राज्य शासनाच्या निर्णय प्रक्रियेत आता डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रही पुढाकारातून राज्यात 'ई-कॅबिनेट' प्रणालीची औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे. पारंपरिक कागदपत्रांऐवजी आता मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना आयपॅड वाटप करून पेपरलेस यंत्रणेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ‘ई-कॅबिनेट’ ही एक अत्याधुनिक डिजिटल प्रणाली असून, यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचे अजेंडे, प्रस्ताव, नोंदी आणि निर्णयांची माहिती फक्त डिजिटल स्वरूपातच सादर केली जाते. त्यामुळे कागदाचा वापर पूर्णतः बंद केला जातो आणि निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि सुरक्षित बनते. राज्यातील प्रशासकीय कार्यपद्धतीत ‘ई-कॅबिनेट’ ही एक क्रांतिकारी पायरी मानली जात आहे. यामुळे वाढता दस्तऐवज भार, मुद्रण खर्च, सुरक्षा त्रुटी यावर आळा बसेल. याशिवाय, डिजिटल दस्तऐवज सहज संग्रहित व पाहणीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments