पीओपी गणेशमूर्तींसंदर्भात न्यायालयात टिकेल असे धोरण करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
- dhadakkamgarunion0
- Jun 30
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पीओपी गणेशमूर्तींसंदर्भात न्यायालयात टिकेल असे धोरण करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
● प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरेनुसार व्हावे, यासाठी पर्यावरणाचा दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले व न्यायालयात टिकेल असे धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासंदर्भात अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात यावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments