पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीच्या मदतीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
- dhadakkamgarunion0
- Jun 4
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीच्या मदतीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
● राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. खरीप २०२५ आणि यानंतरच्या कालावधीतील शेतीच्या नुकसानभरपाईसाठी २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयातील दर आणि निकष लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पावसामुळे सुकी मासळीचे नुकसान झाले आहे. त्या मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली यावर मुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. रस्ते व पूल यांवर झालेल्या परिणामांची दखल घेत ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे सुचवले गेले. विशेषतः रेड अलर्ट घोषित करण्यात आलेल्या भागात प्राथमिकतेने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments