विख्यात कामगार नेते, धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे महासचिव अभिजित राणे यांनी आज 27 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री अनिल परब यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीदरम्यान अभिजित राणे यांनी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक यांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात चर्चा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता त्यामुळे रिक्षा ऑटो टॅक्सी चालक मालकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून त्यांचा हा परवाना पुन्हा देण्यात यावा या मागणीबरोबर त्याचबरोबर रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत चर्चा केली. माननीय परिवहन मंत्री अनिल परब यांनी अभिजित राणे यांच्याद्वारे प्रखरपणाने मांडलेल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्याबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.





Comments