पर्यावरण दिनाचे औचित्यसाधत ‘बोस फाउंडेशन’ ने आरेमध्ये लावली २०० झाडे कार्यक्रमास आमदार मुरजी पटेल, बाळा नर व कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- Jun 5
- 1 min read
पर्यावरण दिनाचे औचित्यसाधत ‘बोस फाउंडेशन’ ने आरेमध्ये लावली २०० झाडे
कार्यक्रमास आमदार मुरजी पटेल, बाळा नर व कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
-----
विशेष प्रतिनिधी, मुंबई
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘बोस फाउंडेशन’ तर्फे ‘एक पेड शहीदों के नाम -अ ट्री फॉर एव्हरी हिरो’ या कार्यक्रमाअंतर्गत गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी परिसरात न्यूझीलंड हॉस्टेल येथे सकाळी 630ः ते 10 वा. वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास अंधेरी विधानसभेचे आमदार मुरजी पटेल, आमदार बाळा नर, धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव अभिजीत राणे, आरे चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिरपूरकर यांनी प्रमूख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. ‘बोस फाउंडेशन’ च्या प्रमुख पियु चौहाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल २०० वृक्ष लावण्यात आले.
वन परिसरात स्वच्छता आणि वृक्षारोपण वृक्ष संवर्धन यासाठी ‘बोस फाउंडेशन’ ही संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत असून, या वृक्षमित्र संस्थेतर्फे दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . या उपक्रमाद्वारे देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांना वृक्षरोपणाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच आरे परिसरात वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कायमस्वरूपी आसन लावण्यात आली असून त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणात पर्यावरण प्रेमींनी सहभाग नोंदवला.
#WorldEnvironmentDay #AareyForest #TreePlantation #OneTreeForEveryHero #BoseFoundation #BalaNar #PiyuChouhan #AbhijeetRane #MurjiPatel #GreenMumbai































댓글