🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
संभ्रमित, भयभीत विरोधकांचा फडणवीसांकडून समाचार
■ संभ्रमित नव्हे, खरेतर भयभीत झालेल्या विरोधकांचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, 'आमच्या विरोधकांचे कन्फ्युजन बघा. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार, निवडणुकीनंतर योजना बंद होणार. दुसरीकडे तेच भाषणांमध्ये सांगतात की हे १५०० रुपये देतात आम्ही निवडून आलो तर २००० रुपये देऊ. यांच्याकडे खजिना आहे का? पैशांचे झाड आहे?' फडणवीसांनी विरोधकांचा दुटप्पीपणा उघडा पाडला आहे. तसेही लाडक्या बहिण योजनेमुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे आता स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळे आणि धर्मगुरु व्होट जिहादचा नारा देत होते. आता याचा फायदा होणार नाही, याची स्पष्ट कल्पना महाविकास आघाडीला आलेली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments