[ पंचनामा ]
==================
नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची चपराक
● पुण्यातील आंबेगाव परिसरात उभारलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिवसृष्टीला आम्ही ५० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यात कोल्डवाॅर सुरू असल्याचे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांना चपराक दिली आहे. ते म्हणाले की, 'मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री मावळे आहेत , जिथं कमी पडेल तिथं सगळे मदत करू. एकनाथ शिंदे महाराजांना खूप मानतात आणि पुण्याचे काम असले की अजित पवार तर कधीच नाही म्हणत नाहीत. म्हणून जिथे जिथे कमी पडेल तिथे सरकार आपल्या पाठीशी असेल.' महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक विद्यार्थी इथे आलाच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांना खरा इतिहास सांगितला पाहिजे होता. पण दुर्दैवाने तो सांगितला गेला नाही. विद्यार्थी इथे आले तर सगळा खरा इतिहास त्यांना कळेल. ज्याने शिवसृष्टी बघितली नाही, त्याने जीवनातला एक वेगळा आनंद मिस केला आहे. आम्ही याला मेगा पर्यटनाचा दर्जा दिला असला तरी हे पर्यटन स्थळ नाही लोकांनी अभ्यास करण्यासाठी इथ यावे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Comments