@ABHIJEETRANE
ना. धनंजय मुंडे ! महाआघाडी सरकारमधील एक सिद्ध-प्रसिद्ध नाव. मंत्रीमंडळात तसे 43 मंत्री आहेत पण जे 'टाॅप फाईव्ह' मानले / गणले जातात त्यापैकी एक .. धनंजय मुंडे! सामाजिक न्याय हे खाते आजवर तसे दुर्लक्षित राहिले. पण कर्तृत्ववान आणि समर्पित भावनेने काम करणा-या व्यक्तीच्या हाती सूत्रे आली तर काय चमत्कार घडू शकतो हे धनंजय मुंडे यांनी वर्षभराच्या कारकिर्दीत दाखवून दिले आहे. धनंजय मुंडे यांचे सार्वजनिक राजकीय जीवन ही एक संघर्ष गाथा आहे. एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचे राजकीय पालन पोषण केले आणि कार्यकर्त्याचे रूपांतर नेत्यात केले. एक असा नेता की ज्याने स्वतःचे हजारो कार्यकर्ते आणि लाखो अनुयायी निर्माण केले जे वैयक्तिक निष्ठा आणि समर्पित भावनेने धनंजय मुंडे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाले. धनंजय मुंडे हा एक हिरा आहे हे ओळखून शरद पवार साहेबांनी त्यांना जणू दत्तक घेतले. धनंजय मुंडे यांना राजकीय गती आणि प्रगतीचा महागुरू लाभला. महाराष्ट्रात एक ना एक दिवस उपमुख्यमंत्री होण्याचा मान ज्यांना मिळेल असे गृहीत धरले जाते त्यात धनंजय मुंडे हे नाव आहे. सध्या प्रकृती अस्वास्थ्याने ते लिलावती हाॅस्पिटलमध्ये ते दाखल आहेत आणि याचा गैरफायदा घेत सोशल मिडीयावर त्यांच्या चारित्र्यहननपर मोहीम सुरू झाली आहे. पण धनंजय मुंडे यांना ओळखणारा कुणीही ग्वाही देईल की धनंजय मुंडे यांचे चरित्र निष्कलंक आणि चारित्र्य बावनकशी सोन्यासारखे अनेक अग्नीदिव्यातून तावून सुलाखून निघालेले आहे. साक्षात शरद पवार साहेबांनी मस्तकी वरदहस्त ठेवलेले धनंजय मुंडे सध्या सोशल मिडीयातून चाललेल्या मिडीया ट्रायल मधून सुरक्षित सुखरूप आणि निर्दोष सिद्ध होतील याची आम्हाला खात्री आहे. धनंजय मुंडे यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा आणि हितशत्रूंच्या कारस्थानावर मात करण्यासाठी संपूर्ण समर्थन!
- अभिजीत राणे, धडक कामगार युनियन
@ABHIJEETRANE (AR)
आ.अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिका निवडणुक समितीची सूत्रे हाती घेताच वीज बील थकबाकी वसूली आणि माफीच्या मुद्द्यावर प्रकाशगड येथे केलेले उग्र आंदोलन सामूहिक शक्ती प्रदर्शन म्हणून प्रभावी झाले. मुंबई भाजपा नेत्यांमध्ये आशिष शेलार, विनोद तावडे आणि अतुल भातखळकर हे तीन मराठी नेते मुंबई महापालिकेच्या राजकारणातील अंतःप्रवाहांचा अभ्यास असलेले आणि त्यांना वळण देऊ शकणारे संघटना कुशल आणि डावपेच निपूण नेते म्हणून ओळखले जातात. आशिष शेलार यांनी मागील मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी बरोबरी करून दाखवली होती पण नवा चेहरा द्यावा या भूमिकेतून अतुल भातखळकरांवर ही जबाबदारी सोपवली असावी. अतुल भातखळकर हे जवळपास रोजच विविध मराठी न्यूज चॅनल्सवर भाजपा प्रवक्ते या नात्याने आपल्या युक्तीवाद चातुर्याचा उपयोग करीत भाजपाची बाजू मुद्देसूदपणे मांडतात. आदरणीय विद्वान विश्लेषक विचारवंत ही अतुलजींची प्रतिमा आहे. सर्व जाती जमाती भाषिक धर्मीय लोकांशी त्यांची जवळीक आहे. ते देवेंद्रजी फडणवीस यांचे पट्टशिष्य आहेत आणि त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपालाअनुकूल वातावरण निर्मिती करीत असतानाच शिवसेनेच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचारावर ते प्रभावीपणे टीकास्त्र सोडतील, एक्पोझ करतील यात शंका नाही. दोन वर्षे बाकी असल्याने प्रत्येक मतदारसंघांत कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय अतुलजी पुढील वर्षातच इच्छुकांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून घेऊ शकतात. भाजपाने विशेषतः देवेंद्रजींनी दाखवलेला विश्वास अतुल भातखळकर सार्थ ठरवतील यात शंका नाही. शुभेच्छा आणि अभिनंदन अतुलजी!!
Comments