top of page

धडक कामगार युनियन महासंघ तर्फे "धडक"च्या रिक्षा चालकांच्या मुला मुलींनी शालेय बॅग व वह्या वाटप

  • dhadakkamgarunion0
  • Jul 1
  • 1 min read

धडक कामगार युनियन महासंघ तर्फे "धडक"च्या रिक्षा चालकांच्या मुला मुलींनी शालेय बॅग व वह्या वाटप

=====

मुंबई : धडक कामगार युनियन महासंघ आणि दक्ष नागरिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या लहान मुला-मुलींना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.


रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी धडक कामगार युनियनच्या आरे कॉलनी, गोरेगाव येथील कार्यालयात झालेल्या या उपक्रमात धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनच्या सभासदांच्या मुला-मुलींना शालेय बॅग आणि वह्या वाटण्यात आल्या.


कार्यक्रमाला धडक कामगार युनियनचे संस्थापक व महासचिव प्रसिद्ध कामगार नेते अभिजीत राणे प्रमुख उपस्थित होते. दक्ष नागरिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील कुमार, धडक कामगार युनियनचे सल्लागार गणपत कोठारी, कमलेश वैष्णव यांची विशेष उपस्थिती लाभली.


यावेळी बोलताना अभिजीत राणे म्हणाले, "आमच्या रिक्षा चालकांच्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ देणार नाही, हे आमचे कर्तव्यच आहे. शिक्षणाची योग्य साधनं मिळाली, तर ही मुले पुढे जाऊन यशस्वी होतील आणि समाज घडवतील."


कार्यक्रमाचे आयोजन धडक कामगार युनियनने केले होते. उपस्थितांनी यासाठी आयोजकांचे आभार मानले.


#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #दक्षनागरिकफाउंडेशन #शालेयसाहित्यवाटप #शिक्षणासाठीएकपाऊल #SocialResponsibility


 
 
 

Kommentarer


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page