top of page
  • dhadakkamgarunion0

देवेंद्र फडणवीस आधी विचार करून मग बोलतात ..

ABHIJEET RANE (AR)

"लाखो लोक रोज माझे मेसेज वाचतात"

याचे रहस्य काय?

असा प्रश्न मला काल एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात विचारला.

मी उत्तर दिले ..

"माझे विचार आणि लोकांच्या मनातील भावना यांचे प्रतिनिधीत्व त्या मेसेज मध्ये असते "

खरेच आहे मित्रांनो,

मेसेज लिहिताना माझी भूमिका आणि तुमचा द्रुष्टीकोन या दोन्हींचा विचार माझ्या मनात असतो.

फीडबॅक पाठवा.

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

देवेंद्र फडणवीस आधी विचार करून मग बोलतात ..

महाआघाडी नेत्यांच्या प्रमाणे ..

आधी बोलुन मग विचार करीत बसत नाहीत..

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले गौप्यस्फोट त्यांच्यावरच "बुमरैंग" होतील अशी जी शक्यता काही मिडियावाले आणि महाविकास नेते बोलून दाखवत आहेत ती खरी ठरणार नाही नाही नाही.. फडणवीस यांचा घाव वर्मीच बसणार .. !

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

उगाचच.. असाच.. विचार करून पाहूया का ? सरकार महाआघाडीचेच पण पण.. मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज ठाकरे.. काय फरक पडला असता ?

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

असाही विचार करायला काय हरकत आहे की भाजपा आणि मनसे युतीचे सरकार असते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण उपमुख्यमंत्री राज ठाकरे असते तर.. ? काय झाले असते ?

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद झेपत नाही असे राजकीय वर्तुळात बहुतेकांना वाटते पण .. पण.. जर उद्या उद्धवजींनाच तसे वाटले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडायचे ठरवले तर ते शिवसेनेतील कुणाला कुणाला आपल्याऐवजी मुख्यमंत्रीपद देतील? आदित्य? एकनाथ शिंदे? संजय राऊत? सुभाष देसाई? अनिल परब? की शिवसेनेत भांडणे नकोत म्हणून शरद पवार साहेबांना राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री करा म्हणतील? पण मग प्रश्न निर्माण होईल की शरद पवार साहेब राष्ट्रवादीतून कोणाला मुख्यमंत्री करतील? अजितदादा? जयंत पाटील? दिलीप वळसे पाटील ? कितपत शक्यता वाटतेय उद्धवजींनी कंटाळून मुख्यमंत्रीपद सोडण्याची ? मला 50% वाटते बुवा. हल्लीच ते जिवावर आल्यासारखा मुख्यमंत्रीपदाचा एकेक दिवस कसाबसा ढकलत आहेत असे वाटतेय. आजवर एवढे मुख्यमंत्री मी जवळून बघितले पण उद्धवजीं सारखे वैराग्य आलेले, निरिच्छ, निर्विकार आणि निष्क्रियतेत अंतर्मुख मुख्यमंत्री कधीच पाहिले नव्हते. म्हणून प्रश्न की महाराष्ट्रातील स्वतःहून झेपत नाही म्हणून मुख्यमंत्रीपद सोडणारे उद्धवजी हे पहिलेच मुख्यमंत्री ठरतील काय?

www.abhijeetrane.in


10 views0 comments

Comments


bottom of page