*ABHIJEET RANE (AR)*
शिवसेनेने युपीएचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडून काढून ते शरद पवार साहेबांना द्यावे अशी सूचना केली असली तरी 1) स्वतः शिवसेना युपीएचा घटक पक्ष नाही 2) ज्या युपीए आघाडीत सामील व्हायला शिवसेनेने एनडीए मधून बाहेर पडल्यावर नकार दिला त्या आघाडीचे प्रमुख कोण असावेत ? ही चर्चा नाहक उठाठेव नाही काय? 3) या सूचनेमुळे पवार साहेब आणि काँग्रेस + गांधी परिवारातील आधीच असलेला अविश्वास आणि तणाव वाढेल ही शक्यता शिवसेनेने लक्षात घेतली नाही काय? की हा तणाव वाढावा यासाठीच ही "अंतरी कोsपि हेतू" असलेली साळसूद वाटणारी मानभावी सूचना आहे? 4) महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर डझनभर काँग्रेस नेते जाहीर नाराजी व्यक्त करणार हे उघड आहे त्यामुळे महाआघाडीतील घटक पक्षांमधील दुरावा, दुस्वास, दुष्टावा अधिक बटबटीतपणे प्रदर्शित होईल याचा विचार आपण करावा असे शिवसेनेला वाटले नाही काय?
◆
*ABHIJEET RANE (AR)*
"खरा मित्र "तो" .. "जो" सारे जग विरोधात गेले तरी पाठराखण करतो" हा "सुविचार" काय फक्त वाचण्यासाठी असतो? नाही नाही नाही ! सचिन वाझे यांची साथ राष्ट्रवादीने आणि अनिल देशमुख व पवार साहेबांनी सोडली.. सोडली.. सोडली.. एन आय ए ने दहशतवादी गुन्हेगारी कट कारस्थानाच्या पुराव्यांसह सचिन वाझे यांना जेरबंद केले. पण पण पण.. शिवसेना सचिन वाझे यांच्या मैत्रीला जागली.. जागते आहे.. जागणार! उद्धवजींनी विधीमंडळात स्वतःची प्रतिमा , प्रतिष्ठा , प्रभुत्व पणाला लावून "वाझे यांना ओसामा बिन लादेन असल्यासारखे कलंकित करू नका" असे जाहीर साकडे महाराष्ट्रातील जनतेला घातले. याला म्हणतात मैत्री ! टीव्हीवरील न्यूज चॅनेल्सवर सचिन वाझे यांना खलनायक ठरविण्याची अहमहमिका चालू असताना आज पुन्हा एकदा शिवसेनेने "सामना"तून सचिन वाझे यांची खणखणीतपणे बाजू घेऊन सचिन वाझे विरोधकांवर जबरदस्त प्रहार करून ख-या प्रामाणिक जीवलग मैत्रीचा अपवादात्मक पुरावा दिला आहे. मित्र कसाही असो, काहीही असो, कुठेही फसो पण मैत्री कशी अखेरपर्यंत निभवावी याचा महाभारतातील कर्णा नंतरचा आदर्श साक्षात उद्धवजींनी या संकटातही "बदनाम फरिश्ते" सचिन वाझे यांची चतुरस्र चातुर्य आणि औदार्य यातून सिद्ध केला आहे. आज उद्धवजी जशी सचिन वाझे यांची पाठराखण करीत आहेत तशी जर शरद पवार साहेबांकडून छगन भुजबळ यांची "तेलगी कांडा"त केली गेली असती तर छगन भुजबळ यांच्यावर तुरूंगात जाण्याची वेळ आली नसती असे नाही वाटत? एन आय एने जर हस्तक्षेप केला नसता तर उद्धवजींच्या मैत्रीची कवचकुंडले सचिन वाझे यांचेही मित्र म्हणून भरण, पोषण केले तसे संरक्षण करू शकली असती. मित्र असावा तर उद्धवजींसारखा हे सचिन वाझे यांच्यावरील आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात ही मैत्री एक "मिसाल" म्हणून अमर होईल. शोले मधील जय आणि विरू प्रमाणे! तिथेही जिवलग मित्र असून "विरू" कुठे "जय"ला वाचवू शकला होता? तरीपण "ये दोस्ती हम नही छोडेंगे" या गीताच्या रूपाने जय-विरूची मैत्री अमर झालीच ना?तशीच सचिन वाझे यांचे एन आय ए कडून काहीही होवो पण अखेरपर्यंत उद्धवजींनी निभावलेली मैत्री आणि अतुलनीय पाठराखण अमर राहील! खरा मित्र कसा असतो ??? उद्धवजींच्या सारखा असतो!!!
◆
*ABHIJEET RANE (AR)*
क्वचितच कोणाला ठाऊक असेल की २००४ साली युनुस ख्वाजा हत्या प्रकरणात सचिन वाझे यांना जामीनासाठी मदत करायला सर्व सर्व सर्व तत्कालीन शिवसेना नेत्यांनी नकार नकार नकार दिला होता आणि शेवटी एका मुस्लिम दहशतवाद्याशी संबंधित हे प्रकरण आहे असे लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सचिन वाझे यांना जामीनासाठी मदत केली आणि वाझे जामिनावर मुक्त झाले. आज शिवसेनेशी बांधीलकी मानणाऱ्या सचिन वाझे यांना जामीनासाठी २००४ साली संघ परिवाराने ओळखदेख , दुरान्वयानेही संबंध नसताना केवळ हिंदुत्ववादी भूमिकेतून केलेली मदत आणि मुंबईतील शिर्षस्थ शिवसेना नेत्यांपासून ठाण्यातील स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांनी दिलेले नकार नक्कीच आठवत असतील.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
दुःख वाटते आहे पण सत्य कटू असते. मराठा आरक्षणावरील प्रदीर्घ सुनावणीत मराठा समाजाला स्वारस्य नाही नाही नाही. तात्काळ तात्काळ एकच च च रिलीफ हवा आहे आहे आहे.. तो म्हणजे मराठा आरक्षणावरील अंतरीम स्थगिती उठवावी हा.. दुर्दैवाने दुर्दैवाने दुर्दैवाने.. सर्वोच्च न्यायालय.. मग ते खंडपीठ पाच जणांचे असो की अकरा जणांचे होवो .. स्थगिती उठविण्यासाठी अनुकूल दिसत नाही नाही नाही.. उलट उलट ज्या राज्यांमध्ये आरक्षण ५०% हून अधिक आहे त्यांना ते कमी करण्यासाठी सर्वौच्च न्यायालय आदेश देऊन हाहाकार उडवील अशी चर्चा आहे. इतर राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आरक्षण याचिका चुकीचे पद्धतीने चालवली म्हणून आमचे असलेले आरक्षण गेले असा गहजब करतील. मंडल आयोगाच्या शिफारशी नंतर उसळला त्या पेक्षा मोठा आंदोलनांचा गदारोळ देशभरात आरक्षणाच्या मागणीसाठी आणि विरोधासाठी उसळेल. अन्य मुद्दे बाजूला जातील आणि भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आणून विरोधकांना चक्रावून टाकतील. आगे आगे देखो होता है क्या !!
◆
*ABHIJEET RANE (AR)*
केवळ मोठ्या नव्हे तर महान मानल्या गेलेल्या दिवंगत आणि हयात नेत्यांच्या जीवनाचा सध्या मी अभ्यास करतो आहे. लक्षात असे येते आहे की .. नेता कितीही मोठा असला तरी त्यांच्या निधनाने अनुयायांना दुःख आणि विरोधकांना आनंद झाला तरी समाज जीवनात "पोकळी" निर्माण झाली असे श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात, वास्तवात समाज जीवनात अशी पोकळी निर्माण झाली तरी अल्पावधीतच दुसरा कोणी "तो" मृत व्यक्ती ज्या विधायक किंवा विध्वंसक प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो ती उचलून पोकळी भरून काढतो. जात धर्म भाषा प्रांत या वरील विद्वेषी राजकारणात असे अधिक घातक पर्यायी नेते लवकर निर्माण होऊन जागा घेतात. माझ्या एका मित्राला वाईट सवय आहे. गेली अनेक वर्षे तो मला "अमुक एक नेता मेला की "तमुक" प्रकारच्या राजकीय अपप्रवृत्तीचा कायमचा अंत होईल" असे सांगतो. मला ऐकताना औकवर्ड होते पण तो मित्र त्याला न आवडणाऱ्या "त्या" मोठ्या नेत्यांचा लवकरात लवकर मृत्यु व्हावा म्हणजे राष्ट्र किंवा राज्य सुटेल अशी दुर्भावना देखील व्यक्त करतो. अशा दुर्भावना मनात असणारे आणि एखाद्या विशिष्ट नेत्यांच्या मरणाने विशिष्ट समस्या कायमची नष्ट होईल असे मानणारे कदाचित लाखो लोक जगात, भारतात, महाराष्ट्रात असतील पण माझा अभ्यास असे सांगतो की तुम्हाला जी व्यक्ती आणि तिचे आचार विचार तिरस्करणीय वाटतात ती व्यक्ती आणि तिचे आचार विचार हे समाजातील विशिष्ट घटकांच्या गरजेतून निर्माण होऊन ती व्यक्ती मोठी, महान, लोकप्रिय झालेली असते. "ती" व्यक्ती गेली तरी विशिष्ट समाज घटकांची गरज नवा नेता निर्माण करते किंवा स्विकारते. रामायणातील रावण मेला पण महाभारतात दुर्योधन आलाच ना ? नायक ही जशी एका समाज घटकांची गरज असते तसेच खलनायक समाजातील विशिष्ट घटकांच्या गरजेतून निर्माण होऊन मोठे होतात. रामा इतकेच समर्थक रावणाकडे आणि क्रुष्णार्जुनापेक्षा अधिक राजे आणि सैन्य दुर्योधनाकडे होते याचा अर्थ कोण नायक आणि कोण खलनायक याचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि ते त्या त्या समाज घटकांच्या हितसंबंधांनुसार आणि स्थल काल सापेक्ष बदलतात.
Comments