🖋️ अभिजीत राणे लिखित
दै. मुंबई मित्र वि शे ष सं पा द की य
=====
"बटेंगे तो कटेंगे"
एकेकाळी, भारत पश्चिमेला सध्याच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला म्यानमारपर्यंत, उत्तरेला पीओके-बलुचिस्तानपासून दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत विस्तारला होता.
मुघल-ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केले आणि आम्ही आमच्याजवळची जवळपास ६०% जमीन गमावली. कसे?
कारण आमच्यात फूट पडली होती. आमच्यात फूट पडली नसती तर आमच्यावर कोणीही विजय मिळवू शकला नसता; त्याऐवजी आपण जग जिंकले असते.
चीनपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या हिंदू लोकसंख्या २.५ अब्जांपेक्षा जास्त असती.
लोकसभा निवडणूकीत मुसलमान मतांचा वोट जिहाद आणि त्याचे परिणाम आपण पाहिले आहेत. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी "बटेंगे तो कटेंगे"चा इशारा दिला. सकल हिंदू समाजाला एकत्रित राहण्याचे आवाहन केले.
अर्थातच विरोधकांनी आदित्यनाथ यांच्या वक्ताव्यावर ठिकास्त्र सोडले आहे.
"बटेंगे तो कटेंगे"ला वास्तवापासून दूर असलेले द्वेषयुक्त भाषण म्हणणे हे अज्ञान किंवा अजेंडाशिवाय दुसरे काही नाही.
1000+ वर्षांहून अधिक काळ प्रथम मुघल आणि नंतर ब्रिटिश यांच्या अनेक आक्रमणांमुळे हिंदू भूमी, हिंदुस्थानला दुर्दैवाने अत्याचार, धर्मांतर, लूट वगैरे सहन करावे लागले . या लोकांनी आपल्या जमीनी लुटल्या , हिंदूंच्या अनेक पिढ्या मारल्या, त्यांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली, मूल्ये आणि शिकवणी नष्ट करण्यासाठी शक्य ते सर्व केले. संपत्ती चोरली. आपला 60% भुभाग हडपला.
मुघलांच्या अनेक शतकांच्या प्रयत्नांनंतरही, ते आपला धार्मिक पाया विचारधारा आणि वारसा नष्ट करण्यात अयशस्वी ठरले.
इस्लामिक आणि ब्रिटीश यांच्या राहणीमान आणि त्यांनी प्रसारित केलेल्या चुकीच्या इतिहास आणि नितिमूल्यांच्या प्रभावामुळे आणि त्यांनी शिक्षणामुळे अनेक तरुण आणि वृद्ध आपली मूळची नीती मूल्ये जरूर विसरले आहेत.
आपल्या मूल्य प्रणालीचे जतन करणे हे आधुनिक हिंदूंवर अवलंबून आहे. म्हणून हिंदूंचे ऐक्य आणि आपले जीवन या शाश्वत मूल्यांच्या (सनातन धर्म) अनुषंगाने जगणे ही वस्तुस्थिती आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू नये.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशात राहणारे सर्व मुस्लिम एकेकाळी हिंदू होते. त्यांनी भीतीपोटी धर्मांतर केले कारण आमच्यात फूट पडली होती; आपण एकत्र आलो असतो आणि एकमेकांचे संरक्षण केले असते तर कदाचित त्यांनी धर्मांतर केले नसते.
आज जे आपल्यापैकी एक असू शकतात ते सर्वात मोठा धोका बनले आहेत.
अजून वेळ गेलेली नाही. जर आपण एकजूट न राहिलो तर आपण पश्चिम बंगाल, केरळ, जम्मू आणि काश्मीर आणि आणखी काही प्रदेश गमावू शकतो - भारताची पुन्हा फाळणी होऊ शकते.
आज सर्व हिंदूंनी एकत्रित झालेच पाहिजे. हिंदू धर्माला जातींचे राजकारण करून विभागण्याचे, खच्चीकरण करण्याचे प्रयत्न जोरात सुरु आहेत.
हिंदूंनी हा धोका समजून भाषा, जातं, प्रांत याच्यावर आपण प्रथम हिंदू आहोत असा विचार रुजवला पाहिजे.
लक्षात ठेवा - बटेंगे तो कटेंगे!
Comments