‘जागतिक महिला दिन’चे औचित्य साधून ‘दै. मुंबई मित्र’ आयोजित ‘ महिला परिसंवाद’ कार्यक्रम ‘दै. मुंबई मित्र’च्या संपादिका अनघा राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गोरेगाव येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे संपन्न झाला. ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून लाभले. ‘दै. मुंबई मित्र’ परिवाराशी निगडीत असलेल्या महिलांनी कार्यक्रमास उपस्थिती लाभली. सर्व महिलांनी यावेळी आपले मनोगत मांडले. अनघा राणे यांच्या हस्ते प्रत्येक महिलेस भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
अनघा राणे यावेळी आपले विचार मांडताना, महिलाच एकत्र येऊन समाजात विकास घडवू शकतात आपण एकमेकांशी बांधिल राहू. धडक कामगार युनियनच्या महिला विंग च्या माध्यमातून आपण महिलांना न्याय देत असतो. असे यावेळी त्या म्हणाल्या
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, आमच्या युनियनची खरी ताकद या महिला आहेत. आमच्या युनियनच्या महिलाच जेव्हा महिलांच्या समस्या सोडवतात हा योग पाहण्यासारखा असतो. युनियनच्या पाठिशी ‘दै. मुंबई मित्र’ प्रत्येकवेळी प्रसिध्दीच्या माध्यमातून उभा असतो. आजचा ‘दै. मुंबई मित्र’चा हा कार्यक्रम छोटेखानी असला तरी याचा दर्जा मोठा आहे. २३ मार्च रोजी याच हॉटेलच्या ब्लॉसम हॉल मध्ये ‘दै. मुंबई मित्र’चा राज्यस्तरीय काव्य लेखन, निबंध लेखन, वृत्तपत्र लेखन व गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल सोहळा पार पडणार आहे. त्या कार्यक्रमासही आपण यावे. असे निमंत्रण यावेळी उपस्थित महिलांना त्यांनी दिले.
#womensday #internationalwomensday #women #womenempowerment #womensupportingwomen #mumbaimitra #newspaper #abhijeetrane #photo















































































Commentaires