top of page

देवेंद्र, रविंद्र नरेंद्र जितम जितम जितम !!!

  • dhadakkamgarunion0
  • Dec 23, 2025
  • 4 min read

संपादकीय


अभिजीत राणे


देवेंद्र, रविंद्र नरेंद्र जितम जितम जितम !!!


महाराष्ट्रात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल लागले, आणि अपेक्षेप्रमाणे महायुतीने दणदणीत विजय मिळवला! आजच्या या दणदणीत विजयामागे दूरदृष्टी, अनुभव आणि अथक परिश्रमांची यामागे सांगड आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण यांनी देवेन्द्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटाने, शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक काम केले. देवेन्द्रजींच्या सरकारचा भक्कम ट्रॅक रेकॉर्ड, प्रशासनावरची पकड आणि दीर्घ अनुभव याचा त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रभावीपणे लाभ घेतला.


महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका त्यांनी स्वतः फिरून पिंजून काढला! तेही अतिशय लो-प्रोफाईल राहून. फक्त दौरे नाही, तर अनेक बैठका, सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य ठरलं. एकीकडे देवेन्द्रजींचं अनुभवी, स्थिर आणि विश्वासार्ह नेतृत्व आणि दुसरीकडे रवीन्द्रजी यांची मैदानातली ऊर्जा, चिकाटी व संघटनकौशल्य - या संगमातूनच हा कौल तयार झालाय.


कार्यालयात बसून राजकारण करणं नव्हे, तर मैदानात उतरून सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवणं त्यांनी करून दाखवलं. एकच उदाहरण द्यायचे झाले, तर - राज्यातील अतिवृष्टीच्या संकटानंतर लगेच या निवडणुका झाल्या. सरकारने चांगले काम केले हे जेवढे महत्वपूर्ण होते, तेवढेच त्याचे 'मेसेजिंग' पण महत्वाचे होते.


आजचा विजय हा केवळ महायुतीचा नाही, तर देवेन्द्रजींच्या मार्गदर्शनाखाली रवीन्द्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पास केलेली ही पहिली खरी 'पोलिटिकल टेस्ट' होती. संघटन मजबूत करणं, गटबाजी टाळणं, प्रत्येकाला सोबत घेणं आणि शेवटी निकालातून काम बोलू देणं हीच त्यांच्या नेतृत्वाची आज ओळख बनली आहे! असेच समर्पित, जमिनीवर काम करणारे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणारे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणाला गरजेचे होते.


महायुती दणदणीत विजय मिळणार ही विरोधकांसकट जवळपास सगळ्यांना खात्री होती! विरोधकांसकट ह्याकरिता म्हटलं की मविआ ने ही निवडणुक लढवलीच नाही, अत्यंत थंडपणे कसलाही लढा न देता महायुतीला जवळजवळ वॉक ओव्हर देत त्यांनी सपशेल माघार घेतली! हे विधान अत्यंत जबाबदारीने करतोय कुठल्याही प्रकारे ते सांगोपसांगी अजिबात नाही! नीट आठवलं तर बघा कुठेतरी मविआ आघाडीतील मातब्बर नेते मंडळी तुम्हाला प्रचारात, निवडणुकपूर्व किंवा निवडणुक काळात दिसली का? महायुतीचे नेते, अगदी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दणकून प्रचारात आणि निवडणुकीच्या यंत्रणेत अक्षरशः राबत होते, पण मविआ त मात्र सन्नाटा होता! हा सन्नाटा आजचा नाहीय, वर्षभरापूर्वी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धक्क्याचा आहे! ह्या धक्क्यातून ठाकरे, सिनियर पवार आणि राज्य काँग्रेसमधील नेते अजुनही सावरलेले नाहीत! तो धक्का इतका मोठा होता की मविआमधील नेत्यांचे पार अवसान गळाले आहे! लढण्याची वृत्ती सोडा साधा जिगरही उरलेला नाहीय! मातब्बर नेत्यांनीच ही अवस्था असेल तर स्थानिक नेते, कार्यकर्ते ह्यांची काय अवस्था असेल विचार करा!


उबाठा शिवसेना नेते स्व. अभिषेक घोसाळकर ह्यांच्या पत्नी ह्यांनी काल परवा भाजपमध्ये प्रवेश केला तेंव्हा पक्षाला जय महाराष्ट्र करतांना लिहिलेलं पत्र नक्की वाचा! स्व. घोसाळकरांच्या पत्नीच्या माहेरची काहीही राजकीय पार्श्वभूमी नाही, त्या साध्या घरातून आलेल्या आहेत! अतिशय हतबलतेने त्या पक्ष सोडतायत हे त्यांनी पत्रात लिहिलेल्या वाक्यावाक्यात जाणवत होतं! भाजपने पैश्यांनी निवडणुका जिंकल्या हे म्हणणाऱ्या लोकांना मी काय सांगतोय ते कळणार नाही. पैसा हा मोठा फॅक्टर आहेच पण मुळात मविआच्या नेत्यांना निवडणुका तरी लढवायच्या आहेत का हाच मला प्रश्न पडलाय! जसं डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर व्हावे हा त्याच्यावर दबाव लहानपणापासून असतो तसा पाच वर्षातून एकदा होणारी निवडणूक लढवायचीच असते म्हणून लढवायची अशाप्रकारे मविआ ह्या निवडणुकीत उतरली होती! इतकंच कशाला आदित्य ठाकरेंना नगराध्यक्ष निवडणुकांमध्ये उबाठा कुठेही दिसत नाहीय हा प्रश्न विचारल्यावर त्यांचं उत्तर 'आम्ही बीएमसी वर फोकस करतोय' हे होतं ह्याचा दुसरा अर्थ आम्ही कुठेही इतर ठिकाणी मग ते नगराध्यक्ष असो वा इतर महानगरपालिका ह्या आम्ही ऑप्शनला टाकल्यात हाच होतो ना?


निवडणुका कार्यकर्ते जिंकून देतात, नगरपालिका, जिल्हापरिषदा, महानगरपालिका ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांना बळकटी देणाऱ्या निवडणुका असतात! एक एक मतदार घराबाहेर पडून मतदानाला आला पाहिजे हा टास्क असतो! ह्या निवडणुका इतक्या स्थानिक प्रश्नांवर असतात की माझ्या रांगेत पाण्याचा नळ संध्याकाळी न सोडता सकाळी का सोडता ह्यावरून रुसून मतदानाला न येणारे पिढ्यांपिढ्याचे भाजपचे मतदार मी बघितले आहे! त्यांचा रुसवा दूर करून त्यांना मतदानाला बाहेर काढणं, नव्हे त्यांनी आपल्याच पक्षाला मत द्यावं हे कनव्हिन्स करणं महाकठीण असतं! केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र एक चेहरा, करिष्मा फॅक्टर असतो, स्थानिक स्तरावर 'तोच तो सो कॉल्ड ढोल्या, माजलेला बैल, सुस्त म्हैस' असेल तर कार्यकर्त्यांचे काय हाल होतात हे जमिनीवर काम केल्यामुळे मला चांगलंच माहितीय! नुसता पैसा फेकून ह्या स्थानिक निवडणुका जिंकता येत नाहीत! अमाप पैसा आणि जबरदस्त कॅडर बेस हे असल्याशिवाय इतका मोठा विजय मिळत नाही! महायुतीच्या सुदैवाने मविआतील घटक पक्षांना अजूनही हे उमगलेलं नाही!


महाराष्ट्रात भाजपाचे 129 नगराध्यक्ष विजयी झाले,तीन हजारपेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले,अन भाजपाला 2017 पेक्षा मोठा विजय मिळाला पण मालवणात नितेश राणे,कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी महाडिक,औस्यात अभिमन्यू पवार,मुक्ताईनगरात रक्षा खडसे, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार,बीड मध्ये तर विचारता सोय नाही,भुसावळ मध्ये संजय सावकारे, पंढरपूरात प्रशांत परिचारक,भोकरदन मध्ये संतोष दानवे,मंगळवेढ्यात समाधान आवताडे या सर्वांना पक्षाने अनेकवेळा योग्य ती ताकद देऊन ही अपयश आलं.


आयुष्यात सिद्ध करायची संधी नियती प्रत्येकाला एकदा देते,त्याचं सोनं किती जणं करतात याचीच दखल इतिहास घेतो,कधी काळी पराभवाचे घाव सहन केलेल्या निलेश राणेंनी आमदारकीमधून कमबॅक केलं,आज पुन्हा एकदा कणकवली आणि मालवण गड निलेश राणेंनी राखला,तर नितेश राणेंना पक्षाने हिंदुत्वाचा पोस्टर बॉय ही उपाधी व मंत्रिपद देऊन ही आपल्या होम ग्राउंडवर पराभव पत्करावा लागला त्यामुळे पक्षाने भविष्यात नितेश राणेंचे पंख कापण्यास सुरुवात करणे उचित राहील.


औस्यात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना ही पक्षाने अनेक वेळा योग्य त्या संधी देऊन ही आधी लोकसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघात भाजप मताधिक्य देण्यात पिछाडी वर राहिली अन आता नगरपरिषद निवडणुकीत सपशेल पराभव पत्करावा लागला,अभिमन्यू पवारांना आत्मपरीक्षण करून नव्या रणनीतीने पुढे जाण्याची गरज आहे,अन्यथा स्वतःच्या निवडणुकीत विजय अन पक्षाला जिथे गरज आहे तिथे यश मिळणार नसेल तर अभिमन्यू पवारांचं पक्षातील वजन कमी होण्यास या गोष्टी कारणीभूत ठरतील अन पक्ष ही आखडता हात घेईल.


मुक्ताईनगर मध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेनां तर पक्षाने किती दिवस संभाळायचे हा विचार तात्काळ करणे गरजेचे आहे,केंद्रीय मंत्रिपद, पक्षाची यंत्रणा दिमतीला असून ही नगरपालिका जिंकू शकत नाहीत तर मंत्रिपद फक्त भोगण्याची वस्तू नाही हे त्यांच्या लक्षात आलं नसावं,तिकडे चंद्रपूरच्या बल्लारपूर नगरपालिका निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना ही अपयश आलं असून, अनेक टर्म मंत्री पदी राहून ही पक्षाच्या नावाने बोंबा मारायची गरज का पडते याचे चिंतन करावं, स्वतः लोकसभेला आपटले,विधानसभा कशी बशी जिंकली आता नगरपालिका हरली अन पक्षाने ताकद दिली नाही म्हणून बोंबा मारताना लाज वाटत नाही.?


भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे याना ही लोकसभेनंतर नगरपरिषद निवडणूकित पराभव पत्करावा लागला असून त्यांना ही नवीन भूमिका घेऊन पुन्हा तयारी करावी लागेल,बाकी सोलापूर जिल्हा,नाशिक जिल्हा,अन कोकणात पक्षाने सूक्ष्मपणे नियोजन करणे गरजेचे आहे,सातारचा तर नादच खुळा एखाद्या आमदाराला ही लाजवेल इतक्या 42 हजार मतांनी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे,म्हसवड,वाई,अनगर,बार्शी, मैदर्गी,अक्कलकोट याठिकाणी भाजपला विजय मिळाला पण सांगोला,पंढरपूर,मोहोळ याठिकाणी ही भाजपला यश आलं असते तर जयकुमार गोरेच्या नेतृत…


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page