ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
- dhadakkamgarunion0
- Jul 3
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मकोका लागणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
● राज्यात अंमली पदार्थाची तस्करी वाढली आहे. मागील पाच वर्षात जवळपास सव्वा पाच हजार किलो अंमली पदार्थ (एमडी) आणि कच्चा माल जप्त केला आहे. तर ११६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तस्करी करणाऱ्यांना मोक्का लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या अधिवेशनात कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मांडले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसावा, यासाठी मागील अधिवेशनात स्थापन केलेला टास्क फोर्स यावेळी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. काही ठिकाणी एनडीपीएसचे युनिट जिल्हा स्तरावर कार्यरत होते. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात एनडीपीएसचे युनिट स्थापन केले असून अधिकारी आणि अंमलदाराही त्यांना देण्यात आले आहेत. तस्करी विषयीचे गुन्ह्यांबाबत खटला चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावी, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments