ज्या दिवशी ते निर्णय घेतील त्या दिवशी हे सरकार कोसळेल..
- dhadakkamgarunion0
- Nov 22, 2020
- 3 min read
@ABHIJEETRANE (AR)
उद्धवजींना मुख्यमंत्री करायचे नव्हते शरद पवार साहेबांना.. त्यांचा चाॅईस संजय राऊत हे होते. नंतर जेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या तेव्हा शरद पवारांनी संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही यासाठी दोष देखील दिला. पण संजय राऊत यांना स्वतः मुख्यमंत्री होण्यापेक्षा उद्धवजींना मुख्यमंत्री करण्यात अधिक स्वारस्य होते. एकतर ठाकरे घराण्याचे - विशेषतः बाळासाहेबांच्या - ऋणातून उतराई होण्यासाठी उद्धवजींना मुख्यमंत्री करण्याचे त्यांच्या मनात ठाम होते. संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जुळवाजुळव केली नसती तर महाआघाडी सरकार आले नसते आणि उद्धवजी मुख्यमंत्री झाले नसते. आज अनेकजण विचारतात की "संजय राऊत यांनी उद्धवजींना मुख्यमंत्री केले पण संजय राऊत यांना काय मिळाले? भाऊ सुनीलला देखील ते मंत्री करू शकले नाहीत" मुद्दा 1) सुनील राऊत यांना मंत्री करू / होऊ नये हे संजय राऊत यांचे नुसते मत नव्हते तर आग्रह होता. उद्धवजींना मुख्यमंत्री करण्याच्या बदल्यात आपण काही फेव्हर घेतली हा मेसेज संजय राऊत यांना जायला नको होता. अन्यथा शरद पवार तर संजय राऊत यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सिद्ध होते. ते नाकारले तर भावासाठी राज्य मंत्री पद का स्वीकारतील? मुद्दा 2) मुख्यमंत्री उद्धवजींच्या नजरेला नजर देऊन ताठ मानेने आणि ठामपणे बोलण्याची, प्रसंगी विरोध करण्याची ताकद असलेले शिवसेनेतील ते एकमेव नेते आहेत कारण ओशाळे , उपकृत नाहीत. मुद्दा 3) आज अखिल भारतीय पातळीवर राजकीय वर्तुळात आणि मिडीया मध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे नसून संजय राऊत हे आहेत. सामना मधील अग्रलेखाशी उद्धवजींचा सुतराम संबंध नाही तर ते संजय राऊत यांचे व्यक्तीगत मत असते हे ठाऊक असताना सर्व न्यूज चॅनल्स रोज आज सामनाने म्हणजे संजय राऊत यांनी काय लिहिले आहे याची ब्रेकींग न्यूज करतात आणि ही शिवसेनेची भूमिका आहे असे प्रतिपादन करतात यापेक्षा अधिक राजमान्यता आणि लोकमान्यता कोणत्या संपादक/ नेत्याला या देशात मिळाली आहे? मुख्यमंत्री न होता आज संजय राऊत यांच्या मताला मुख्यमंत्री उद्धवजींपेक्षा अधिक मान ,महत्व, वलय आहे ही एक प्रकारे असामान्य अतुलनीय अचिव्हमेंट नाही काय? संजय राऊत सद्यस्थितीत सर्वोच्च सर्वश्रेष्ठ स्थानी आहेत.. सर्वात महत्वाचे म्हणजे महाआघाडी सरकारचे भवितव्य शरद पवार साहेबांपेक्षाही संजय राऊत यांच्या हाती अधिक आहे.. संजय राऊत ठरवतील तोपर्यंत हे महाआघाडी सरकार टिकेल .. ज्या दिवशी ते निर्णय घेतील त्या दिवशी हे सरकार कोसळेल.. !
www.abhijeetrane.in

@ABHIJEETRANE (AR)
अजितदादा पवारांनी साखर कारखान्यांना कर्ज हमीची शिफारस करणा-या समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडे हायकोर्टात सुनावणी दरम्यान साखर कारखान्यांना सरकारने कर्ज हमी दिली आणि कारखान्यांनी सहकारी बँकांची ती कर्जे बुडवल्यावर हमी दिली असूनही सरकारने हमी रक्कम बँकांना देण्याची टाळाटाळ केली यावर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. समिती अध्यक्ष या नात्याने ह्या प्रतिकूल ताशे-यांचे धनी अजितदादांना व्हावे लागले पण कोणत्या साखर कारखान्यांना कर्ज हमी द्यायची याचा निर्णय राजकीय दबावामुळे घेतला जात होता ज्यात शरद पवार साहेबांच्या आदेश निर्देश यावरून हे निर्णय होत होते. अजितदादांचे हित किंवा हितसंबंध नसताना उगाच बदनामी कशाला? या विचारातून हा राजीनामा अजितदादांनी दिला यात शंका नाही. राष्ट्रवादीचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आता या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली आहेत पण यात रिस्क अशी आहे की उद्या हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात ताशेरे ओढले गेले तर मंत्रीपद जाऊ शकते. अजितदादांचे हे शरद पवार साहेबांच्या विरूद्ध बंड म्हणता येणार नाही पण नाराजीचे दर्शन-प्रदर्शन नक्की आहे.
www.abhijeetrane.in

@ABHIJEETRANE (AR)
आपण ज्या दलालाकडून गांजा घेतो त्याला अटक झाली आहे म्हणजे तो ग्राहक म्हणून आपले नाव देणार हे अपेक्षित / गृहीत असताना आणि नारकोटिक्स ब्युरो चौकशी आणि कारवाई साठी आपल्या घरावर छापा टाकणार हे स्पष्ट दिसत असताना घरात गांजा ठेवून स्वतःला अटक करण्यासाठी कारण देणा-या फिल्मी कलाकारांना काय म्हणायचे? ही बेमुर्वतखोरी की बेअक्कलपणा ? सामान्यातला सामान्य बेवकूफ गुन्हेगार देखील अशा परिस्थितीत घरातील असतील नसतील ते सारे पुरावे आधीबिधी नष्ट करतो.. पण एवढीही खबरदारी ह्या अन्यथा यशस्वी कलाकारांना घ्यावीशी वाटत नाही की आपल्यावर कशाला छापा टाकणार ह्या भ्रमात ते असतात की व्यसनाच्या आहारी इतके गेलेले असतात की पकडले जाण्याचा धोका पत्करून त्या दिवशीची तलफ भागवण्यासाठी किमान काही ग्रॅम गांजा अथवा अन्य अंमली पदार्थ घरात ठेवावाच लागतो की अंमली पदार्थ विकणा-याने कबूली दिल्यावर नारकोटिक्स ब्युरोचे अधिकारी जामीन मंजूर होईल अशा मर्यादेत प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असे दाखवण्यासाठी पंचनाम्यात ते स्वतःच उपलब्ध करून दाखवतात आणि केस एकाचवेळी "टाईट" आणि "लूज" करतात?
www.abhijeetrane.in

Comentários