top of page
  • dhadakkamgarunion0

जोपर्यंत माणसे मोठ्या प्रमाणात मरत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र सरकार "बर्ड फ्ल्यू"

*@ABHIJEETRANE(AR)*

जोपर्यंत माणसे मोठ्या प्रमाणात मरत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र सरकार "बर्ड फ्ल्यू"ची कबुली देणार नाही आणि जेव्हा देईल तेव्हा उशीर झालेला असेल..! सरकार असे का वागतेय? तुमचा अंदाज?


 

*@ABHIJEETRANE(AR)*

कोरोनावर लस येईपर्यंत लसीची वाट बघत असलेले भारतीय आता लस प्रत्यक्षात आल्यावर लस घेण्यास उत्सुक सोडा.. तयारही दिसत नाहीत! लस येण्यापूर्वीच लस न घेताच कोणतेही बंधन.. मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग.. न पाळताच कोरोना संपत आलाय म्हणून आता लस कशाला ही मानसिकता सार्वत्रिक झाली आहे. लस हे प्रकरण देखील सोपे दिसत नाही.. बरीच पुर्वतयारी आणि पश्चात खबरदारी घ्यावी लागणार आहे. मला कोरोना होऊन गेला . मी लस बहुतेक घेणार नाही. तुम्ही घेणार?


 

*@ABHIJEETRANE(AR)*

शिवसैनिकांचा गुजराथी लोकांच्या सक्रिय सहभागाला विरोध असणार नाही कारण शिवसेना शाखांच्या कार्यक्रम, उपक्रमांचे मोठे देणगीदार नेहमीच गुजराथी भाषिक व्यावसायिक राहिले आहेत. मुंबईतील बिल्डर व उद्योगधंद्यातील मातब्बर लोक गुजराथी आहेत आणि त्यांचे स्थानिक हस्तक हे शिवसैनिक, शाखाप्रमुख असतात ज्यांच्या जिवावर या गुजराथी मालकांच्या हितसंबंधांचे रक्षण संवर्धन पोषण केले जाते आणि बदल्यात शिवसैनिक व शाखाप्रमुख यांचे पोषण हे गुजराथी उद्योगपती वर्षानुवर्ष करीत आहेत. मराठी माणसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाची प्रेरणा घेऊन मुस्लिम समाजासोबत दुरावा दुस्वास दुर्भावना जतन केली, पण गुजराथी समाजाच्या समृद्धी बद्दल असूया मत्सर वाटला तरी द्वेष केला नाही. उत्तर भारतीयांची केली तशी "काशी" वारंवार जागोजागी केली नाही. बहुतेक गुजराथी हिंदुत्व शिवसेनेचे आदर्श मानतात त्यामुळे "मुंबई मा ढोकळा अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा" ही घोषणा गुजराथी समाजमनात मूळ धरू शकते . आगामी महापालिकेत शिवसेनेचे गुजराथी नगरसेवक निवडून येतील आणि कुणी सांगावे "फाफडा × आपडा" प्रयोग यशस्वी झाला तर शिवसेनेचा महापौर गुजराथी होऊ शकेल कारण त्यातून विधानसभेत गुजराथी मतदार शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर वळू शकतात हे नवीन समीकरण निर्माण होऊ शकेल.


4 views0 comments

Comments


bottom of page